ATM मधून निघाले नाहीत पैसे परंतु अकाऊंटमधून झाले ‘डेबिट’ तर काय करावे? जाणून घ्या पैसे मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक सध्या ATM चा वापर रोकड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे अनेकदा अशी घटना घडते की, ATM मधून पैसे काढताना पैसे तुमच्या खात्यातून कापले जातात परंतु ते मिळत नाहीत. अशा स्थितीत काय करावे, ते जाणून घेवूयात…

 

कोणत्या कारणांमुळे पैसे कापले जातात
ही सुद्धा शक्यता आहे की तांत्रिक कारणामुळे व्यवहार थांबू शकतो किंवा ATM मधील रोकड संपू शकते. अशा स्थितीत तुमचे पैसे खात्यातून कापले जातात. ही दोन कारणे आहेत. पहिल्यामध्ये बँकेने नियमित तपासणी केल्यानंतर तांत्रिक समस्या दूर होऊ शकते. या स्थितीत काही कालावधीनंतर पैसे तुमच्या खात्यात आपोआप जमा होतात आणि बँक तुम्हाला मेसेजद्वारे व्यवहाराची माहिती देते.

 

फ्रॉडसुद्धा होऊ शकतो
फसवणुकीमुळे सुद्धा असे होते. कार्ड रिडरमध्ये एक स्किमर डिव्हाईस लावला जातो, जो चुंबकीय पट्टीतून तुमच्या मशीन मधील पैसे काढण्याची प्रक्रिया पाहातो. तुमचे कार्ड त्या चोरी केलेल्या डेटाचा वापर करून क्लोन करता येऊ शकते आणि तुमच्या नकळत बँक खात्यातून पैसे काढता येऊ शकतात.

काय करावे

आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा
सर्वप्रथम बँकेच्या ग्राहक सेवा विभागासोबत संपर्क साधा. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, खात्यातून कापलेली कोणतीही रक्कम तक्रार दाखल होण्याच्या सात कामकाजाच्या दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यात परत केली पाहिजे.

 

जर वेळेवर पैसे दिले नाहीत तर ते प्रतिदिन 100 रुपये विलंब आकार मिळण्याचा अधिकार आहे.
पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही तुमची तक्रार बँकेच्या शाखेत करू शकता. ज्यानंतर तुमच्या तक्रारीच्या रेकॉर्डच्या आधारावर पैसे खात्यात पाठवले जातात.

 

शाखा व्यवस्थापकाशी बोला
बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सुद्धा तक्रार करू शकता आणि ट्रांजक्शन संबंधी माहिती मिळवू शकतो आणि कापलेले पैसे खात्यात परत घेऊ शकता.

 

हे सुद्धा काम करू शकता
जर या पर्यायांपैकी कोणताही उपयोगी आला नाही तर भारतीय रिझर्व्ह बँक किंवा अधिकार्‍यांना माहिती देऊ शकता.
अशा तक्रारी रेखल स्वरूपात किंवा पत्राद्वारे किंवा इंटरनेटवर करता येऊ शकतात.
पैसे परत मिळवण्यासाठी, तक्रार दाखल करण्याच्या किमान 30 दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. (ATM)

 

Web Title :- ATM | what to do if money is not withdrawal from the atm but debited from know process of getting money

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sanjay Raut | दिल्लीत FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेने साखरपुड्यामध्ये वाजवलं सुशांतच्या चित्रपटातील ‘हे’ गाणं

Alia Bhatt | आलिया भट्टनं सैफ अली खानच्या मुलाला केलं ‘रिजेक्ट’ ! केली रणवीरची निवड, पाहा व्हायरल Video