पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Attack On Girl In Sadashiv Peth Pune | एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ सकाळच्या वेळी एका तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी जामीन मंजूर केला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय-21 रा. डोंगरगाव ता. मुळशी) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 27 जून 2023 रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली होती. सदाशिव पेठेत भररस्त्यात आरोपीने तरुणीवर पळत जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लेशपाल जवळगे या तरुणाने प्रसंगावधान दाखवल्याने ही तरुणी थोडक्यात बचावली होती. (Attack On Girl In Sadashiv Peth Pune)
आरोपी शंतनू जाधव याने ॲड. अभिषेक हरगणे, ॲड. स्वप्नील चव्हाण, ॲड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटींवर न्यायालयाने जाधव याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. (Attack On Girl In Sadashiv Peth Pune)
आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर तरुणीचा बचाव करणारा लेशपाल जवळगे म्हणाला, या तरुणाला जामीन मंजूर झाल्याचे समजले. आपल्या देशात कायदा प्रबळ आहे. त्यामुळे कायद्यानुसार सगळी प्रक्रिया पार पडते. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे, असा अलिखित नियम आपल्या देशात पाळला जातो. त्यामुळे या प्रकरणी देखील योग्य कारवाई होईल आणि शिक्षा दिली जाईल, अशी खात्री आहे. भविष्यात हाच मुलगा महिलांच्या सुरक्षेसाठी त्याचं समर्पित करेल, अशी अपेक्षा बाळगतो, असे लेशपाल म्हणाला.
प्रेमाला नकार दिल्याने हल्ला
प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून हा प्रकार घडला होता. आरोपी आणि तरुणी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते.
तेव्हापासून हा तरुण या तरुणीच्या प्रेमात होता. त्यानंतर तरुणीने प्रेमाला नकार दिला होता. याचा राग त्याला आला.
त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी देखील आरोपीच्या घरी हा प्रकार सांगितला होता. तरुणाच्या आईने त्याला समजावलं होतं.
परंतु घरापर्यंत माहिती गेल्याचा राग त्याला अनावर झाला. त्याने 27 जून 2023 रोजी सकाळी दहाच्या सुमारास
सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र लेशपाल जवळगे याच्या प्रसंगावधानाने तरुणी थोडक्यात बचावली.
याबाबत 20 वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
यावरुन पोलिसांनी आरोपी शंतनू जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली होती.
तेव्हापासून तो कोठडीत होता.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना