Attack On Maharashtra Police Squad | गुन्हेगारांना शोधण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर इराणी कबिल्याचा हल्ला, 10 पोलीस जखमी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Attack On Maharashtra Police Squad | कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकालगत असलेल्या इराणी कबिल्यात गुन्हे करुन पळालेल्या आरोपीच्या शोधात अंधेरी पोलिसांचे पथक गेले होते (Kalyan Crime). त्यावेळी इराणी कबिल्यातील महिला, पुरुषांच्या हिंसक जमावाने पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Attack On Maharashtra Police Squad)

याबाबत 15 हल्लेखोरांसह इतर अनोळखी 15 जणांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 307, 399, 353, 332, 333, 336, 224, 225, 427, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे दाखल दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.9) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. (Attack On Maharashtra Police Squad)

अंधेरी भागात झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात हसन अजीज इराणी आणि जाफरी युनिस इराणी उर्फ बड्डा व इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत होते. आरोपींचा शोध घेत असताना चोरटे इराणी वस्तीत लपल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री केल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री अंधेरी पोलिसांचे एक पथक इराणी वस्तीत आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी स्थानिक खडकपाडा पोलिसांचे पथक देखील सोबत होते. त्यामुळे तिन्ही फरार आरोपांना अंधेरी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.

पोलीस पथकावर हल्ला, 2 आरोपी पळाले

दरम्यान, वस्तीमध्ये पोलीस आल्याची माहिती मिळताच इराणी आरोपींच्या कुटुंबीयांनी आरडा ओरडा करून वस्तीला जागे केले. त्यानंतर अचानक वस्तीमधील महिला, पुरुषांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक, दांडके घेऊन पोलिसांचा पाठलाग सुरु करत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पथकातील दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. महिला व पुरुषांनी अचानक हल्ला केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन आरोपी फरार झाले तर एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात नियमित वेगवेगळे गुन्हे करुन सराईत गुन्हेगार आंबिवली रेल्वे स्थानकालगत असलेल्या इराणी काबिल्यात वास्तव्य करुन असतात. मागील 30 ते 35 वर्षात या वस्तीतून अनेक सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हेगारांना लपण्यासाठी सोयीस्कर जागा

आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ आणि आडबाजूने पळून जाण्यासाठी गुन्हेगारांना याठिकाणी सोयीस्कर जागा आहे. त्यामुळे बहुतांश इराणी गुन्हेगार गुन्हे केल्यानंतर या वस्तीत आश्रय घेतात असतात. कल्याण परिसरातील स्थानिक पोलिसांना या वस्तीमधील इराणी नागरिकांच्या हल्ल्याची माहिती असल्याने ते कौशल्याने या भागातून आरोपीला ताब्यात घेतात.

सहा महिन्यात 2 ते 3 वेळा हल्ले

मुंबई पोलीस तुकडीने येऊन इराणी वस्तीमध्ये घुसून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात.
या वस्तीच्या आतील भागाची माहिती नसल्याने इराणी वस्ती मधील नागरिकांनी अचानक हल्ला सुरु केला की
पोलिसांची तारांबळ उडते. अशा प्रकारे मागील सहा महिन्यात दोन ते तीन वेळा पोलिसांवर हल्ले झाले आहेत.
तर मागील अनेक वर्षात 50 हून अधिक अशा घटना घडल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, गुरुवारी मध्यरात्री अंधेरी पोलिसांचे एक
पथक गुन्हेगारांना शोधण्यासाठी आले होते. त्यावेळी या पोलीस पथकावर जमावाने अचानक हल्ला केला.
याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांपैकी आतापर्यंत कोणालाही अटक केली
नसून सर्वच आरोपी फरार आहेत. पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत. तसेच पथकावर हल्ला करणाऱ्या 8 इराणी
महिलांवर पहिल्यांदाच मोक्का कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The Archies Trailer | जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा ट्रेलर झाला रिलीज, सुहाना खान सोबतचं खुशी कपूर दिसणार दमदार भूमिकेत !

ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल