The Archies Trailer | जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा ट्रेलर झाला रिलीज, सुहाना खान सोबतचं खुशी कपूर दिसणार दमदार भूमिकेत !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बहुचर्चित ‘द आर्चीज’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे (The Archies Trailer). जोया अख्तरच्या (Zoya akhtar) या चित्रपटामध्ये अनेक स्टारकिड प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे (The Archies Trailer).

सोशल मीडियावर आज म्हणजेच 9 नोव्हेंबरला ‘ द आर्चीज ’ या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे. हे ट्रेलर ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) असणाऱ्या नेटफिक्सने आपल्या यूट्यूबच्या चॅनेलवर प्रदर्शित केलं आहे. हा चित्रपट एका कॉमिक बुकवर आधारित असून, चित्रपटाची कथा शाळकरी मित्रांची आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधील (The Archies Trailer) स्टारकिड्सचा अभिनय रसिक प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. हा चित्रपट 1960 च्या काळावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटामध्ये प्रेम, मैत्री, फिडम आणि हार्ट ब्रेक दाखविण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘द आर्चीज (The Archies Upcoming Movie)’ या चित्रपटामध्ये सुहाना खान आणि खुशी कपूरने
(Khushi Kapoor) आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तसेच सुहाना खान आणि खुशी कपूरच्या
व्यतरिक्त अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) देखील ‘द आर्चीज’ मधून चित्रपटसृष्टीमध्ये
पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुनी 500 ची नोट मागण्याच्या बहाण्याने रोकड लंपास, स्वारगेट परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना डिवचले, म्हणाले – ’40 वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण…’

MLA Ravindra Dhangekar | ललित पाटील ड्रग्स केस : …तर पोलीस आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करणार, आमदार रविंद्र धंगेकरांचा इशारा