Attack on Police | धक्कादायक ! 2 गटातील भांडणं सोडवताना जमाव बिथरला, पोलिसांवरच केला तलवारीने हल्ला

चंदिगड : वृत्तसंस्था –  दोन गटात भांडण सुरु असल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहताच बिथरलेल्या जमावाने पोलिसांवरच हल्ला (Sword Attack on Police) केला. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगड आणि विट (Stone pelting) फेकल्या. त्यानंतर पोलिसांना धक्काबुक्की करत तलवारीने हल्ला (Sword Attack on Police) केला. यामध्ये सहा पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं ?

पंजाबमधील (Punjab) पंचकुला भागात दोन गटामध्ये वाद आणि भांडणं सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दोन्ही गटातील लोकांना वेगवेगळे करुन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्यातील काही लोकांनी पोलिसांवरच दगड आणि विटा फेकल्या.
पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरुच ठेवली. जमावातील काही लोकांनी तलवारी घेऊन पोलिसांवरच हल्ला केला.
जमावाने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर वार झाले आहेत.
तर एका पोलिसाला वीट लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

 

पोलिसांकडून हवेत गोळीबार

संतप्त झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन राऊंड फायर (Two round fire) केले. गोळाबारामुळे जमावाची पांगापांग झाली.
याच दरम्यान पोलिसांनी ड्रोनच्या (Drone) माध्यमातून लोकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या लोकांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
हल्ले नेमके कोणी केले याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांच्या गाडीची तोडफोड

जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. तसेच पोलिसांची पीसीआर गाडी (PCR vehicle) फोडली.
याशिवाय पोलिसांची एक अ‍ॅक्टिव्हा गाडीची तोडफोड केली.
जमावातील काही लोकांनी पोलिसांना शिव्या देणे सुरु ठेवल्याने जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांवर हल्ला केला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

 

Web Title : Attack on Police | sword attack on police by mob in punjab

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Ganeshotsav | यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळाचं झालं एकमत (व्हिडीओ)

Assam-Mizoram Border Clash | मूळच्या पुण्याच्या IPS ऑफिसरची मृत्यूशी यशस्वी झुंज’, सीमा संघर्षात लागल्या होत्या गोळ्या

UBI Recruitment 2021 | उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती