×
Homeक्राईम स्टोरीमुरबाड : सासूने सुनेला जाळून टाकण्याचा केला प्रयत्न

मुरबाड : सासूने सुनेला जाळून टाकण्याचा केला प्रयत्न

मुरबाड : पोलिसनामा ऑनलाईन – जमिनीच्या वादातून सासूने सुनेला अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना धानीवली गावात घडली. याप्रकरणी पीडित शिक्षिका संगीता भोईर यांनी सासू, सासरे, दोन दीर व भावजय यांच्या विरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षिका असलेल्या संगीता या कल्याण येथे राहतात. त्यांच्या मूळगावी धानीवली येथे वाटणीला आलेल्या जागेत घर बांधणे सुरू केले. गुरुवारी संगीता या घराचे काम बघण्यासाठी धाणीवली येथे गेल्या असता सासूने घरात बोलावून अंगावर डिझल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान यासंदर्भात बोलताना संगीता यांचे दीर विकास भोईर म्हणाले की, ज्यावेळी घटना घडली त्यावेळी आमचे वडील, आम्ही दोन्ही भाऊ आणि आमच्या पत्नी घरी नव्हतो. या घटनेशी आईचाही काही संबंध नसावा. हे सगळे घडवून आणल्यासारखे वाटते. तसेच संगीता यांना आम्ही रस्त्याला जागाही सोडली आहे.शिवाय जमिनीचा विषय आम्ही तिघे भाऊ सांमजस्याने सोडवणार होतो, असेही त्यांनी सांगितले.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News