Atul Bhatkhalkar | भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला, म्हणाले ‘धरणात…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Atul Bhatkhalkar |चिपळून दौऱ्यावर असताना अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलताना त्यांचा तोल गेला. यावरुन राज्यात भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) यांच्यात सामाना रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. चिपळून दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी रागाच्या भरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सणसणीत टोला लगावला आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करुन अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

चिपळून दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी रागाच्या भरात ‘सीएम बीएम गेला उडत आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यासोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे.
मग इथे कोण आहे ?’ असे राणे म्हणाले. यावर काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्याबाबत अरे-तुरे शब्द वापरले.
पण ही महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती नाही, असे म्हणत अजित पवार यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता सुनावलं होतं.
त्याच विषयीची एक कात्रण अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आणि अजित पवार यांना त्यांच्या जुन्या विधानाचा दाखला देत सणसणीत टोला लगावला.

अतुल भातखळकर यांनी अजित पवार यांना टोला लगावताना म्हटले की, धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या अजित पवार यांना नारायण राणे यांचे अरे-तुरे इतके का झोंबावे ?
असा प्रश्न विचारत भातखळकर यांनी अजित पवार यांना सणसणीत टोला लगावला आहे.

Web Title : Atul Bhatkhalkar | ncp ajit pawar slammed by bjp atul bhatkhalkar over narayan rane uddhav thackeray fight

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

Police Officers Transfer | पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

Indian Oil | इंडियन ऑईलची जबरदस्त ऑफर ! ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ ऑफरमधून 2 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या ऑफर