ऑडीचे सीईओ रुपर्ट स्टॅडलर यांना जर्मनीत अटक 

बर्लिन:वृत्त्तसंस्था
लोकप्रिय फोक्सवॅगन च्या ऑडी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रुपर्ट स्टॅडलर यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. स्टॅडलर  यांना सोमवारी जर्मनी येथे अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ऑडीच्या गाड्यांच्या उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत फेरफार करण्यात आल्याची बाब उघडकीस आली होती.

आता याच प्रकरणी चौकशी करण्याकरिता रुपर्ट स्टॅडलर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जर्मनीच्या तपासयंत्रणानी हे स्पष्ट केले आहे.