धक्कादायक ! बागेत तरूण जोडपं गुलूगुलू बोलत बसलं होतं, 5-6 युवक आले अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जालाननगर उद्यानात तरुणांच्या दोन गटांत लाठ्या, काठ्या आणि दगडांनी जोरदार हाणामारी झाली. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचं समजतं.

येथील प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांच्या माहितीनुसार, उद्यानात एक जोडपे बसले होते. तेव्हा तिथे पाच, सहा तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर तरुणीसोबत असलेल्या तरुणाने फोन करून त्याच्या मित्रांना बोलावले. त्यांनी या तरुणांवर हल्ला चढविला. त्यानंतर दुसऱ्या गटातील तरुणांनी देखील आपल्या साथीदारांना बोलावून घेत येथे केला. जवळपास २० ते २५ तरुण एकमेकांवर तुटून पडल्याचं अनेकांनी मोबाइलमध्ये शूट केले. नागरिकांनीच पोलिसांना ही माहिती दिली.

घटनास्थळावर पोलिस दाखल होताच तरुणांनी उद्यानातून दिसेल त्या मार्गाने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत तिघांना पकडलं. प्रेम प्रकरणातून राडा झाल्याची कबुली त्यांनी दिली. दरम्यान, घडलेल्या घटनेचा व्हीडिओ पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचला. त्यांनी रोपींना पकडण्याचे आदेश दिले. त्यानतंर पोलिसांकडून सांयकाळी उशिरापर्यंत इतर तरुणांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं.