
Aurangabad ACB Trap | दारु विक्रीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी, दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्डड्रिंक्सच्या दुकानात विना परवाना दारु विक्री करुन देण्यासाठी मासिक हप्ता म्हणून 3 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) एमआयडीसी सिडको शहर पोलीस ठाण्यातील (MIDC Cidco Police Station Police Station) दोन पोलिसांना औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.7) करण्यात आली. औरंगाबाद एसीबीच्या (Aurangabad ACB Trap) कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस हवालदार दया ओहळ (Police Constable Daya Ohal), पोलीस शिपाई अविनाश गणेश दाभाडे Avinash Ganesh Dabhade (वय-33) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. याबाबत 33 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) सोमवारी (दि.6) तक्रार केली. तक्रारदार यांचे कोल्डड्रिंक्सचे दुकान आहे. दुकानात विना परवाना दारु (Liquor) विक्री करुन देण्यासाठी मासिक हप्ता म्हणून पोलीस हवालदार दया ओहळ याने तीन हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता दया ओहळ याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दया ओहळ याने लाचेची रक्कम पोलीस शिपाई अविनाश दाभाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना दाभाडे याला रंगेहाथ पकडले. यानंतर दया ओहळ याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे (Police Inspector Hanumant Vare),
पोलीस अंमलदार शिरीष वाघ, साईनाथ तोडकर, बागुल यांच्या पथकाने केली.
Web Title : Aurangabad ACB Trap | Two cops in anti-corruption net after demanding bribe to allow liquor sale
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update