Aurangabad ACB Trap | प्रशिक्षणातून सवलत देण्यासाठी लाचेची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

0
2154
Aurangabad ACB Trap | Women Clerk of Public Works Department in anti-corruption net, demanding bribe for concession from training
file photo

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – खात्यांतर्गत सुरु असलेल्या प्रशिक्षणातून (Training) सवलत देण्यासाठी औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम मंडळातील महिला लिपिक सीमा दिनकर पवार Seema Dinkar Pawar (वय-47) यांना 2 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.2) केली.

याबाबत 41 वर्षाच्या महिलेने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे खात्यांतर्गत चार महिने प्रशिक्षणाकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद या ठिकाणी कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) प्रशिक्षणासाठी होते. त्यांना पंधरा दिवस प्रशिक्षणातून सवलत पाहिजे होती. सवलत देण्यासाठी सीमा पवार यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पवार यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना सीमा पवार यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस उप अधीक्षक दिलीप साबळे (DySP Dilip Sable),
पोलीस हवालदार बाळासाहेब थोरात, पोलीस नाईक भीमराव जीवडे, महिला पोलीस नाईक पुष्पा दराडे यांच्या
पथकाने केली

Web Title :- Aurangabad ACB Trap | Women Clerk of Public Works Department in anti-corruption net, demanding bribe for concession from training

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anurag Kashyap | ‘सेक्रेड गेम्स 3’ येणार नाही; अनुराग कश्यप यांचे मोठे वक्तव्य

Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडेने घेतला मोठा निर्णय; म्हणाली – ‘मी यापुढे…’