Aurangabad Crime News | नववधूने लग्नाच्या 6 दिवसांनंतर सासरच्या माणसाच्या हातावर तुरी देत केले पलायन; औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime News | राज्यात मुलींचे प्रमाण कमी झाल्याने मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. यामुळे लग्न लावून देतो या बहाण्याने फसवणुकीच्या (Cheating Case) घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक फसवणुकीची घटना औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं आहे. विवाहानंतर घरगुती पूजेत पतीसह सासरची मंडळी व्यग्र असल्याची संधी साधत नववधू दागिन्यांसह पसार झाली. या प्रकरणी फसवणूक (Fraud Case) झाल्याची तक्रार सासरच्या मंडळींकडून दाखल करण्यात आली आहे. (Aurangabad Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
फिर्यादी गंगापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. शेतकरी असलेल्या फिर्यादीस वधू हवी होती. यासाठी त्यांनी जनार्धन कारभारी पेठ (रा. नागमठाण, वैजापूर) यांस वधू बघण्यासाठी सांगितले. यानंतर जनार्धन कारभारी पेठ यांनी लग्न जुळवून दिले. मुलीचे नातेवाईक असल्याचे सांगणारे विकास बापू शिंदे (रा. मलकापूर, जि. बुलढाणा, ह. मु, वडगाव कोल्हाटी) गणेश रमेश पवार (देवगिरी कॉलनी), सूरज सोहबराव शिंदे ( नाशिक, ह. मु. वडगाव कोल्हाटी) व दोन अनोळखी महिला यांनी लग्नाआधी मुलीची मावशी आजारी पडल्याचा बनाव केला. उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत 1 लाख 40 हजार रुपये हातउसने म्हणून द्या, अशी मागणी वराच्या कुटुंबीयांकडे केली. यानंतर फिर्यादीने यावर विश्वास ठेवत आरोपींना पैसे दिले. त्यानंतर काही दिवसांनी लग्नासाठी म्हणून फिर्यादीने होणाऱ्या सुनेसाठी 40 हजार रुपये किमतीचे दागिने करून दिले. (Aurangabad Crime News)

यानंतर ठरल्याप्रमाणे 12 डिसेंबर 2022 रोजी लग्न झाले.
त्यानंतर 6 दिवसांनी म्हणजे 18 डिसेंबर 2022 रोजी नववधू अंगावरील दागिन्यासह पसार झाली.
टोळीतील एका सदस्याच्या दुचाकीवरून ती गेल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
आरोपींनी संगनमत करुन बनावट मुलीसोबत मुलाचे लग्न लावून दिले तसेच आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून 16 फेब्रुवारी 2023 रोजी गंगापूर पोलिस ठाण्यात नववधुसह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :-Aurangabad Crime News | six days after wedding bride ran away with jewels in aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime News | एका शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या मग स्वतःदेखील केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड