Aurangabad Crime | चालत्या बसमधून डोके बाहेर काढणे बेतलं जिवावर, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | शहरात एक मोठी अपघाताची घटना समोर आली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) एका सिटी बसमध्ये बस मागे घेताना मोठा अपघात झाला. नववीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. ओंकारेश्वर पंडित (Omkareshwar Pandit) असे दुर्देवी विद्यार्थ्याचे नाव असून, परीसरात हळहळ (Aurangabad Crime) व्यक्त केली जात आहे.

 

 

औरंगपुरा ते साजापूर ही बस मागे घेत असताना हा अपघात घडला. एस. बी. शाळेत नववीच्या वर्गात शिकणारा ओंकारेश्वर मागील सीटवर बसला होता. यावेळी बस मागे घेत असताना, तो खिडकीतून बाहेर डोकावत होता. यावेळी त्याचे आणि चालकाचे लक्ष नसल्याने बस मागे घेत असताना, बाजूलाच असलेल्या गेटचा पोल ओंकारेश्वरच्या डोक्याला लागला. (Aurangabad Crime)

ही धडक इतकी मोठी होती की, विद्यार्थी रक्तबंबाळ झाला.
चालकाला हा प्रकार लक्षात येताच त्याने तात्काळ त्याला रिक्षाने घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) दाखल केले.
मात्र त्याअगोदरच त्याची प्राणज्योत मालवली होती.

 

Web Title :- Aurangabad Crime | sticking head out of a city bus cost life class 9 student died on the spot in aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा