Aurangabad Crime | उद्योग मंत्र्यांच्या नावाने गुन्हेगारांचा ‘उद्योग’, नोकरीचे आमिष दाखवून महिलेने उकळले 20 लाख

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांच्या नावाने फसवणूक (Fraud) केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad Crime) एका महिलेने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वीस लाख रुपये उकळले. सामंत यांचे संपूर्ण काम माझा मुलगा पाहतो अशी थाप मारुन या महिलेने एका दाम्पत्याकडून भाच्याला नोकरी लावण्यासाठी वीस लाख रुपये उकळले. याबाबत उस्मानपुरा पोलीस ठाण्यात (Osmanpura Police Station) महिलेच्या विरोधात फसवणुकाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

सुरेखा विवेक काटे Surekha Vivek Kate (वय-53 रा. दशमेनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी क्षेत्र व्यवस्थापक (MIDC Area Manager) अशोक रसाळ (Ashok Rasal) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेने उर्वरित रक्कम व नोकरीचा करारनामा बॉण्डवर लिहून दिल्याचे समोर आले आहे. (Aurangabad Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने 16 सप्टेंबर रोजी दीपाली संदीप कुलकर्णी (Deepali Sandeep Kulkarni) व संदीप कमलाकर कुलकर्णी (Sandeep Kamlakar Kulkarni) या दाम्पत्याच्या भाच्यास उद्योग विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. आपला मुलगा केदार हा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सगळे काम पाहतो अशी थाप सुरेखा काटे यांनी मारली. कुलकर्णी दाम्पत्याने नोकरी लावण्यासाठी 25 लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी 20 लाख रुपये 16 सप्टेंबर रोजी रोख स्वरुपात घेतले. तर उर्वरीत 5 लाख रुपये नोकरीची ऑर्डर मिळाल्यानंतर घेण्याचा करारनामा बॉण्ड पेपरवर करण्यात आला.

उदय सामंत यांचे कारवाईचे आदेश

दरम्यान, उदय सामंत यांच्या नावाने कोणीतरी महिला पैसे उकळत असल्याची माहिती समजली.
त्यामुळे त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आरोपी महिला सुरेखा काटेच्या विरोधात कारवाई करण्याचे
आदेश दिले. त्यानुसार अशोक रसाळ यांनी पोलिसांत तक्रार दिली.
तर कुलकर्णी दाम्पत्याने सुरेखाला वीस लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
कायदेशीर बाजू तपासून आरोपी महिलेला अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title :- Aurangabad Crime | the woman extorted 20 lakhs in the name of industries minister uday samant by pretending to be the lure of a job

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tunisha Sharma Suicide Case | तुनिषा आत्महत्या प्रकणात पोलीस तपासात झाला खुलासा; ‘आत्महत्यापूर्वी तुनिषा आणि शिझान यांच्यात झाले होते संभाषण’

Urmila Nimbalkar | मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या हॉट फोटोजने वेधले सर्वांचेच लक्ष; फोटोज वायरल

Ajit Pawar | ‘बावनकुळेंच्या त्या वक्तव्यानंतर आमची तर झोपच हरपली’, अजित पवार यांचा मिश्कील टोला