औरंगाबाद : वैजापुरात लव्हबर्डची आत्महत्या 

वैजापूर : पोलीसनामा आॅनलाइन
वैजपूर शहरापासून जवळच असलेल्या रोठीवस्तीत प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सदरची घटना आज (3 जुलै) रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.अोढणीने गळफास घेऊन प्रेमप्रकरणातून दोघांनी जीवनयात्रा संपविल्याचे समजते.
सागर राहूल म्हैसमाळे (वय 25) व साक्षी बाबासाहेब शेजवळ (वय 18) राहणार दोघेही जांबरगाव ता वैजापूर अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. साक्षी ही वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती तर सागर हा व्यवसाय करीत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, वैजापूर शहराजवळील असलेल्या लाडगाव रस्त्यावरील रोठीवस्तीजवळील नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पोटचारीलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघेजण आढळले.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल  केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.