औरंगाबाद : एमआयएमच्या ‘त्या’ नगरसेवकाला एक वर्षाची कोठडी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

औरंगाबाद महापालिकेत माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणं एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन याला चांगलच भोवलं आहे. वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या मतीनला इतर गुन्ह्यांमध्ये एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’024d1b30-a6e1-11e8-b191-9d57909440eb’]

सय्यद मतीन विरोधात एमपीडीए आणि महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ ऑगस्ट रोजी पालिका महासभेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मतीनने विरोध केला होता. त्यामुळे मतीन आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. मात्र हा वाद आणखीनच वाढल्याने भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतीनला सभागृहात चोप दिला होता. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मतीनला अटक करण्यात आली होती.
[amazon_link asins=’B075X5PCX2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0783cae7-a6e1-11e8-9b04-b7ba496fe1e6′]

अटकेनंतर त्याची हर्सूल तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. परवा मंगळवारी त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र लगेचच पोलिसांनी त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक केली. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासल्यानंतर तो दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करू शकतो, असं आढळून आलं. त्यामुळे वर्षभरासाठी त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आल्याचं सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डि. एस. शिनगारे यांनी सांगितले.