Avatar Movie | अवतार सिनेमावरील ‘त्या’ वक्तव्याने गोविंदा झाला चांगलाच ट्रोल; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन | Avatar Movie | बॉलीवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदाचे जगभरात लाखो चाहते आहेत. आज अभिनेता गोविंदाचा ५९ वा वाढदिवस आहे. विनोदाची हातोटी आणि त्याचे अफलातून टायमिंग यावर गोविंदाची विशेष पकड आहे. त्यातच तो एका नव्या कारणाने सोशल मीडियावर सध्या ट्रोल होताना दिसत आहे. ते म्हणजे अभिनेता गोविंदाने दिग्दर्शक जेम्स कॅमरूनच्या अवतार (Avatar Movie) सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे. त्याचे अवतार सिनेमाबाबतचे एक वक्तव्य सध्या सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल होताना दिसत आहे.

अभिनेता गोविंदाने एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये अवतार (Avatar Movie) सिनेमावर भाष्य केले आहे. त्यात गोविंदा म्हणाला आहे की, अवतार या सिनेमाची ऑफर त्याने नाकारली. तसेच या सिनेमाचे नाव हे ‘अवतार’ देण्याचे देखील मीच दिग्दर्शकांना सुचवल्याचे गोविंदा म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे तो सोशल मिडीयावर चांगलाच ट्रोल झाला आहे.

या मुलाखतीदरम्यान गोविंदा म्हणाला, ‘अवतार (Avatar Movie) हे नाव मी त्यांना दिलं. शिवाय हा चित्रपट सुपरहिट होणार हे देखील मीच त्यांना सांगितलं. हा चित्रपट बनायला ७ वर्षे लागतील असही मीच त्यांना सांगितलं. बरोबर आठव्या वर्षी चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. मला यासाठी विचारण्यात आलं होतं, पण यासाठी तब्बल ४०० दिवसांपेक्षा जास्त काळ लागणार होता, आणि संपूर्ण शरीरावर निळा रंग लावणार होते, मला ते काही जमणार नव्हतं त्यामुळे मी या चित्रपटाला नकार दिला होता.’

जेम्स कॅमरून दिग्दर्शित अवतार – २ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून हा सिनेमा चांगलीच कमाई
करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदाचा हा जुना व्हिडीओ शेअर केला जात आहे.
त्याच्या या मुलाखतीनंतर गोविंदा चांगलाच ट्रोल झाला होता. लोकांनी तर त्याला अक्षरशः वेड्यात काढलं होतं.
या प्रकरणावरून बरेच वाद प्रतिवाद देखील पहायला मिळाले होते.
पण लोकांना गोविंदाचे हे वक्तव्य चांगलेच खटकले असून लोक त्यावर आजदेखील मिम्स शेअर करत आहेत.

Web Title :- Avatar Movie | when govinda got trolled because of his statement on james cameron avatar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ambadas Danve | मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

Health Alert | रात्री होत असेल झोपमोड तर व्हा सतर्क! धोक्यात आहे तुमच्या शरीराचा ‘हा’ अवयव

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….