
Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….
पोलीसनामा ऑनलाईन | सध्या बॉलीवूडमध्ये लगीनघाई सुरू असून अनेक अभिनेते अभिनेत्रींनी आपले विवाहसोहळे या वर्षी उरकले आहेत. तर काही अभिनेते अभिनेत्री आई बाबा देखील झाले आहेत. त्यातच आता बिग बॉस सीझन ६ ची विजेती गौहर खान (Gauahar Khan) हीने देखील चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. गौहर खान (Gauahar Khan) हिचा विवाह अभिनेता झैद दरबार याच्यासोबत २०२० मध्ये झाला होता. आणि लग्नाच्या तीन महिन्यानंतर गौहर खान गरोदर असल्याची चर्चा होत होती. त्यावर अभिनेत्री प्रचंड भडकली होती.
येत्या २५ डिसेंबरला गौहर (Gauahar Khan) आणि झैद यांच्या लग्नाचा दूसरा वाढदिवस आहे. त्याआधीच खुद्द गौहरने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. तिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती गरोदर असल्याची बातमी तिने दिली आहे. तिने ही बातमी आपल्या चाहत्यांना अतिशय अनोख्या आणि मजेशीर पद्धतीने दिली आहे. तिने आपल्या सोशल मिडीयावर एक कार्टूनचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात गौहरने (Gauahar Khan) ‘गौहर झैद आणि +१’ असं सांगत तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
त्याचबरोबर ‘या सुखद प्रवासात तुमच्या आशिर्वादाची गरज आहे’ असे लिहित एकप्रकारे तिने तिच्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. गौहर खान आणि झैद दरबार यांचा विवाह २५ डिसेंबर २०२० मध्ये झाला होता.
त्यानंतर हे जोडपे सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या आठवणी शेअर करत असतात.
त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
त्यातच आता गौहर खानने दिलेल्या या गोड बातमीमुळे तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गौहर खान ही बॉलीवूड मधील एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नुकतीच गौहरने नेटफ्लिक्सवरील ’14 फेरे की कहानी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे.
Web Title :- Gauahar Khan | bollywood actress gauahar khan announces her pregnancy through unique instagram post
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nana Patole | खोटारडेपणा अन् चेष्टा हाच भाजपचा खरा चेहरा – नाना पटोले