Avika Gor | सोशल मीडियाच्या पोस्टवरुन कोणाला कामं मिळत नाही; अभिनेत्रीच्या वक्तव्याच्या सर्वत्र चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा असणारी अभिनेत्री अविका गोर शोबीज (Avika Gor) ही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. अविकाने लोकप्रिय ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) मालिकेमध्ये काम केले असून या मालिकेमुळे घराघरात अविकाची ओळख निर्माण झाली. अविकाने मालिकांनंतर आता बॉलीवुडमध्येही पदार्पण केले आहे. अविकाने ‘1920 – हॉरर ऑफ़ द हार्ट’ (1920: Horror of the Heart) या चित्रपटामधून सिनेविश्वामध्ये पदार्पण केले. कृष्णा भट्ट (Krishna Bhatt) दिग्दर्शित हा चित्रपट 1920 चा सिक्विल आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नसला तरी अविकाच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली. आता अविकाने (Avika Gor) सोशल मीडिया पोस्टमुळे कामं मिळत नसतात असे सांगितले आहे. तिचे हे वक्तव्य गाजत असून अनेकांनी तिला सहमती दर्शवली आहे.

अभिनेत्री अविका गोर शोबीज ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग मोठा असून तिला इंस्टाग्रामवर 1.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिथे ती अनेक फोटोशूट (Avika Gor Photoshoot) शेअर करत असते व आगामी प्रोजेक्ट बद्दल माहिती देत असते. पण सोशल मीडियवर पोस्ट करण्याबाबत मला कोणीही जबरदस्ती करु शकत नाही. मला योग्य वाटते ती पोस्ट मी सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि कोणालाही सोशल मीडियाच्या पोस्टवरुन काम मिळत नसते. त्या कलाकारांमधील अभिनय कौशल्य व प्रतिमा पाहूनच काम दिले जाते असे मत अभिनेत्री अविका गोर हिने मांडले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री अविका गोर बोलत होती. ती म्हणाली की, सोशल मीडियावर मी अनेक गोष्टी शेअर करत असते. पण त्या करण्यासाठी मला कोणी फोर्स नाही करु शकत. अनेकदा मी मुद्दाम सोशल मीडियापासून लांब राहते. तर कधी कधी मी इतर कामांमध्ये व्यस्थ असते. माझ्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे माझ्याकडे कोणता प्रोजेक्ट येत नाही. ते माझ्याकडे येतात कारण एक अभिनेत्री म्हणून त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना खूश करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते नक्कीच अवघड आहे.

अविकाने पुढे तिचा पती मिलिंद चंदवानी (Milind Chandwani) याच्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, एका महिलेसाठी तिच्या कामासाठी तिच्या साथीदाराकडून सपोर्ट मिळणे खूप गरजेचे असते. मिलिंद मला दररोज अधिकाधिक चांगले करण्याची प्रेरणा देतो आणि मला माझी कला वाढवण्यास मदत करतो. जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हांला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सांभाळून घेत असेल तेव्हा तुम्ही तणावाशिवाय काम करू शकता.

कामाबद्दल देखील अविकाने मत मांडले आहे. अभिनेत्री अविका गोर (Avika Gor) म्हणाली की माझे पदार्पण
‘1920 – हॉरर ऑफ़ द हार्ट’ या चित्रपटामधून झाल्यामुळे मी खूप समाधानी आहे. मला ओटीटीवर (OTT Movies)
देखील काम करायचे आहे. तसेच मला रोमॅंटिक चित्रपटांमध्येही काम करायचे आहे.
मला कामामध्ये आनंद मिळतो, त्यामुळे ते माध्यम कोणतेही असो मला काम करायला आवडते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | मुंढवा बिट मार्शलच्या कर्तव्य तत्परतेमुळे 70 वर्षीय वयोवृद्ध महिला सुखरुप