Avneet Kaur | बॅकलेस फोटोशूटने अवनीत कौरने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन – बालकलाकार ते बॉलीवुडची हिरोईन असा प्रवास असलेली अवनीत कौर (Avneet Kaur) ही सध्या चर्चेत आहे. अवनीतने नुकतेच हिरोईन म्हणून पदार्पण केले असून ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अवनीत तिच्या हॉट व बोल्ड फोटोंनी (Avneet Kaur Hot Photo) नेटकऱ्यांना अवाक करते. अवनीतने (Avneet Kaur) नुकतेच एक बॅकलेस गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलीवुडमधील हॉट अभिनेत्री अवनीत कौर हिचे फोटोशूट हे चर्चेचा विषय बनते. अवनीतचे प्रत्येक फोटोशूट हे रिव्हिलिंग (Revealing Photoshoot) असते. यावेळीही तिने बॅकलेस फोटोशूट केले आहे. तिने मोरपंखी रंगाचा रिव्हिलिंग गाऊन परिधान केला असून ज्वेलरी स्टाईल केली आहे. अवनीतच्या या फोटोवर तिचे चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहे. अनेकांनी तिला रेड हार्ट इमोजी दिल्या आहेत.

अभिनेत्री अवनीत कौरने (Avneet Kaur) अनेक चित्रपटांमध्ये व मालिकांमध्ये काम केले आहे. आता ‘टीकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटामधून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण ( Bollywood Debut) केले. यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सोबत अवनीतने स्क्रीन शेअर केली. कंगणा राणौत (Kangana Ranaut) निर्मित हा अवनीतचा पहिला चित्रपट असून तिने किसिंग सीन (Avneet Kissing Scene) दिल्याने तिला ट्रोल देखील करण्यात आले होते.

Shasan Aplya Dari In Jejuri | ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने ड्रोन वापरावर बंदी

Varandha Ghat Road | पुणे: पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्गावरील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद