Varandha Ghat Road | पुणे: पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्गावरील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Varandha Ghat Road | पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्ग (Pandharpur Bhor Mahad National Highway) क्र. ९६५ डीडी वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत २२ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपूर्णपणे बंद (Varandha Ghat Road Closed For Heavy traffic) करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) यांनी जारी केली आहे. (Varandha Ghat Road)

या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Varandha Ghat Road)

जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नारंगी आणि लाल इशाऱ्याच्या वेळी सर्व प्रकारच्या अवजड,
मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद राहील. नारंगी आणि लाल इशारा नसलेल्या कालावधीत सदर घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Electricity Connections In Pune | नवीन वीजजोडणी, नादुरुस्त मीटर बदलासाठी मीटरचा तुटवडा नाही

Delhi Court grants regular bail to BJP MP Brij Bhushan in sexual harassment case

NCP Political Crisis | शरद पवारांना आणखी एक धक्का, ‘या’ राज्यातील 7 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

Raigad Irsalwadi Landslide | पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं ! 98 जणांना वाचवण्यात यश तर 16 जणांचा मृत्यू; NDRF ची माहिती

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक