Advt.

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी, रसाने त्वचा होईल गोरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदात आवळा हे फळ खूप महत्वाचे आहे. आवळ्याचा वापर करून विविध प्रकारची औषधे तयार केली जातात. कारण आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विविध आजारांवर आवळा लाभदायक आहे. सौंदर्यवृद्धीसाठी आवळा फायदेशिर ठरतो. आवळयामुळे केस लांबसडक मजबूत आणि निरोगी राहतात. शिवाय, त्वचेसाठीही आवळा खूपच फायदेशीर आहे.

आवळ्यामधील अँटिऑक्सिडेंट्सने केस काळे आणि दाट होतात. हा रस इतर रसासोबत एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा गोरी होते. तसेच आवळ्याचा रस आणि एलोवेरा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास रंग गोरा होतो. मुरूमही बरे होतात. मात्र, चेहऱ्यावर लावण्यासाठी ताज्या आवळ्याचा रसाचा वापरावा.

दीर्घकाळ ठेवलेल्या रसामुळे त्वचेला समस्या निर्माण होऊ शकते. डायटमध्ये दूध, अंड्यासारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे केस आणि त्वचा निरोगी राहते. चेहरा आणि केसांवर जास्त रसायनाचा वापर करू नका. यामुळे त्वचा खराब होऊन केस जास्त गळतात. केसांवर आवळ्याचा उपाय करण्यासाठी आवळा वाळवून पावडर बनवावी. ही तीन चमचे पावडर पाण्यात मिसळून हे पाणी गाळून केसांवर लावावे. यामुळे केस काळे आणि दाट होतात. गाळणीमध्ये उरलेला आवळा केसांच्या मुळांवर लावावा. यामुळे कोंडा दूर होऊन केसांची चमक वाढते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/