इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ 14 सोपे आयुर्वेदिक उपाय, घरातील ‘या’ वस्तूंचे करा सेवन, दूर होईल संसर्गाचा धोका

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सरकारच्या आयुष मंत्रालयाने काळजी घेण्यासाठी काही आयुर्वेदिक पद्धती सांगितल्या होत्या. यांचा वापर करून रोग प्रतिकारशक्ती वाढवता येते. अशाच प्रकारचे अनेक खुप सोपे उपाय असून घरात उपलब्ध वस्तूं वापरून आपण इम्युनिटी वाढवू शकतो. याबाबत जाणून घेवूयात…

हे उपाय करा
1. वारंवार हलके गरम पाणी पित रहा.
2. जेवणात हळद, जिरे, धने, सुंठ आणि लसूणचा वापर करा.
3. ताज्या आवळ्यापासून बनवलेली उत्पादने सेवन करा.
4. कोमट पाण्यात हळद आणि मीठ मिसळून गुळण्या करा.
5. ताजे जेवण सेवन करा. सहज पचणारे अन्न खा.
6. दररोज किमान 30 मिनिटे योगासन करा, प्राणायम आणि ध्यान करा.
7. दिवसा झोपू नका. रात्री किमान 7-8 तास झोप घ्या.

इम्युनिटी वाढवण्याच्या पद्धती
8. कोमट पाण्यासह रिकाम्या पोटी 20 ग्रॅम च्यवनप्राशचे सेवन करा.
9. दिवसात दोन वेळा हळदीचे दूध प्या, 150 एमएल दूधात अर्धा चमचा हळद मिसळून दूध बनवा.
10. रोज हर्बल चहा किंवा काढा प्या. हर्बल चहा किंवा काढ्यात तुळस, दालचिनी, आले, काळीमिरी टाकून बनवा. याची टेस्ट वाढवण्यासाठी गुळ, मुनका आणि छोटी वेलची मिसळा.

हे उपाय सुद्धा करू शकता
11. सकाळ-संध्याकाळ नाकात तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल किंवा गाईचे तूप टाका.
12. एक चमचा तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल तोंडात टाका, हे आत घ्यायचे नाही तर 2-3 मिनिटापर्यंत तोंडात इकडे-तिकडे फिरवा. यानंतर ते थुंकून टाका आणि गरम पाण्याने तोंड आतून स्वच्छ करा. हे दिवसात दोन वेळा करा.
13. सूका खोकला किंवा घशात खवखव असेल तर पाण्याची वाफ घ्या. यामध्ये पुदिना, ओवा, कापूर मिसळून सुद्धा दिवसातून एकदा वाफ घेऊ शकता.
14. घशात खवखव असेल तर लवंग, मुलेठीची पावडर, साखर किंवा मध मिसळून घेऊ शकता.

जर ही लक्षणे जास्त दिवस राहीली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. (वर सांगितलेली औषधे कोरोनावरील उपाय नाहीत. हे इम्युनिटी वाढवू शकतात.)