आयुष्मान खुरानाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन ! फोटो शेअर करत पत्नी ताहिरा कश्यप म्हणाली- ‘It’s a Girl…’

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांच्या घरी एक नवीन पाहुणा आला आहे. ताहिरानं सोशलवर या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. सोशलवर तिनं पोस्टही शेअर केली आहे. ही एक मुलगी आहे आणि हिचं नाव पीनट आहे असं तिनं पोस्टमधून सांगितलं आहे. पीनट आयुष्मान आणि ताहिरा यांचा नवीन पाळीव प्राणी आहे. याचा फोटोही ताहिरानं शेअर केला आहे.

ताहिरानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती पीनट सोबत दिसत आहे. या सोबत तिनं एक पोस्टही लिहिली आहे. ताहिरा लिहिते की, ही एक मुलगी आहे आणि हिचं नाव पीनट आहे. आम्ही तिला खूप जीव लावत आहोत. तिचीही एक स्टोरी आहे. प्लीज स्वागत करा.

ताहिराची ही पोस्ट समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली. अभिनेत्री कृती सेनन हिनंही यावर कमेंट करत लिहिलं की, ती पीनट खुरानाला भेटायला आणखी प्रतिक्षा करू शकत नाही

ताहिराच्या या पोस्टवर नुसरत भरूचा, यामी गौतम, नीति मोहन, तारा शर्मा अशा अनेक अभिनेत्रींनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या ताहिराची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.