खा. आजम खानचे वादग्रस्त विधान ; म्हणाले, मरदशातून नथुराम गोडसे, साध्वी प्रज्ञा सारखे लोक जन्माला येत नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कायमच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले समाजवादी पक्षांचे नेेते आणि खासदार आजम खान यांनी गोडसे आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावर बोलताना त्यांनी मदशातील शिक्षणावर बोलून त्यांनी नथूराम गोडसे आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. आजम खान म्हणाले की, मदरशामधून महात्मा गांधींना मारणारे नथूराम गोडसे आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सारखे लोक जन्माला येत नाहीत, असे म्हणत त्यांनी पुन्हा वाद उखरुन काढला आहे.

का बोलले आजम खान गोडसे आणि साध्वी बद्दल –

पत्रकारांशी बोलताना त्यांना पत्रकारांकडून मोदी सरकार मदरशांना मु्ख्यधारेत आणण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना त्यांनी गोडसे आणि प्रज्ञा सिंह साध्वी यांनी मध्ये घेत ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. ज्यामुळे आता वादंग उठण्याची शक्यता आहे.

मदरशात शिकणाऱ्या मुलांना मीड डे मील द्या –

आजम खान यांनी मोदी सरकारच्या ५ वर्षात ५ कोटी मदरशातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी ३ ई या योजनानेवर त्यांनी निशाणा साधला आहे. स्कॉलरशिप तर तुम्ही द्याल तेव्हा द्याल, परंतू कमीत कमी मदशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मीड डे मील तरी द्या, जसे तुम्ही दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना देतात.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी