दानशूरता ! समाजसेवेसाठी अझीम प्रेमजी यांचं 1,45,000 कोटींचं दान, बिल गेट्सलाही टाकले मागे

बेंगलुरु : वृत्तसंस्था – व्हिप्रोचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांची अझीम प्रेमजी फाउंडेशन ही संस्था सामाजिक कार्यासाठी सर्वाधिक निधी देणारी काॅर्पोरेट संस्था बनली आहे. याबाबतीत अझीम प्रेमजी यांनी बिल गेट्सलाही मागे टाकले आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशन गरीबांना तसेच वंचितांना देणगी देत असते. आता अझीम प्रेमजी फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये तब्बल 52 हजार 750 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून दिल्या जाणऱ्या एकूण देणगीची रक्कम 1 लाख 45 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे.

आपल्या एकूण संपत्तीच्या 50 टक्के संपत्ती दान करू अशी घोषणा काही वर्षांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी केली होती. यानंतर आता या घोषणेनुसार, व्हिप्रोच्या नफ्यातील मोठा वाटा ते अझीम प्रेमजी फाउंडेशनला दान करतात. अझीम प्रेमजी विद्यापीठही शिक्षणाचे कार्य करते. या कार्याला अधिक गती यावी म्हणून प्रेमजींनी देणगीची रक्कम वाढवली आहे. हा पैसा संपूर्ण देशभर गरीब, वंचित मुलांच्या शिक्षणावर खर्च केला जातो.

समोर आलेल्या माहितीनुसार, अझीम प्रेमजी विद्यापीठात सध्या 1300 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या वाढवत 14 हजारापर्यंत नेण्याची फाउंडेशनची इच्छा आहे. मुख्य म्हणजे उत्तर भारतातही या विद्यापीठाची एक शाखा सुरू केली जाणार आहे. व्हिप्रोमध्ये प्रेमजी कुटुंबाचे 74 टक्के शेअर्स आहेत. दरम्यान त्यातील 67 टक्के शेअर्समधून येणारं उत्पन्न प्रेमजी समाजसेवेसाठी, गरीबांसाठी दान करतात आणि केवळ 7 टक्के उत्पन्न कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी वापरतात.

ह्याहि बातम्या वाचा –

३ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

खोतकरांना उमेदवारी द्या ! अन्यथा शिवसेना भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेन

‘या’ ६ महत्वाच्या जागांवर भाजपाचे उमेदवार बदलण्याची शक्यता ; उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार

बाबासाहेब पाटील यांची राष्ट्रवादीच्या कला व सांस्कृतिक विभाग सेलच्या कार्याध्यक्षपदी निवड