Baghi 3 Box Office Day 1 Prediction : पहिल्या दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी , की होणार ‘कोराना’चा परिणाम ?

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर स्टारर बागी 3 सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. सिनेमात टायगरची दमदार ॲक्शन, फाईट तसेच वॉर लोकेशन दिसत आहेत. या सिनेमात नात्यांचा इमोशनल टच देखील आहे. सिनेमात रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे हेदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. 6 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. रिपोर्टनुसार असं म्हटलं जात आहे की, हा सिनेमा पहिल्या दिवशी 15 कोटींची कमाई करू शकते. येणाऱ्या आठवड्यात हा सिनेमा 50 कोटींहून अधिक कमाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

…तर मोडेल अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमाचं रेकॉर्ड
जर बागी 3 या सिनेमानं पहिल्या दिवशी 15 कोटींची कमाई केली तर हा सिनेमा अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमाचं रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. तान्हाजी सिनेमानं पहिल्या दिवशी 15.10 कोटींची कमाई केली होती. बागी 3 या सिनेमात टायगर श्रॉफ पहिल्यांदाच आपल्या वडिलांसोबत ॲक्शन ड्रामा करताना दिसणार आहे.

ADV

अलीकडेच या सिनेमातील दिशा पाटनीचं आयटम साँग रिलीज करण्यात आलं होतं. डू यु लव मी ? असं या गाण्याचं नाव आहे. गाण्यात दिशा पाटनी खूपच हॉट अवतार दिसला होता. चाहते तिच्या सौंदर्याचं आणि डान्सचं खूप कौतुक करताना दिसले. या गाण्याची खूप चर्चा झाली होती.

https://www.instagram.com/p/B9D_UxygBd7/

अहमद खान दिग्दर्शित बागी 3 सिनेमात टायगर आणि श्रद्धा लिड रोलमध्ये आहे. सिनेमाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. टायगर आणि श्रद्धाची केमिस्ट्री बागीनंतर पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. या सिनेमात टायगर आणि श्रद्धा व्यतिरीक्त रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, आशुतोष राणा, सतीश कौशिक, चंकी पांडे, नोरा फतेही, अनु कपूर हे कलाकार देखील आहे. 6 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Baaghi 3 Box Office Day 1 Prediction: बागी 3 पहले दिन कमाएगी इतने करोड़, या होगा कोरोना वायरस का इफ़ेक्ट