Baba Ramdev Controversy | ठाण्यातील वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – योगगुरू रामदेव बाबा (Baba Ramdev Controversy) यांचा शुक्रवारी ठाण्यात कार्यक्रम झाला. त्यांनी तिथे योग विज्ञान शिबिर घेतले, त्यानंतर महिलांचा योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या योग शिबिरानंतर लगेच महिला महासंमेलन पार पडले. महिलांनी या कार्यक्रमात येताना योगासाठी ड्रेस आणि महासंमेलानासाठी साड्या आणल्या होत्या. पण योग्य प्रशिक्षणानंतर लगेच महासंमेलन सुरु झाल्याने महिलांना त्यांनी आणलेल्या साड्या घालायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे महिला थोड्या नाराज होत्या. तेव्हा बाबा रामदेव (Baba Ramdev Controversy) म्हणाले, ‘महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, काही घातलं नाही तरी चांगल्या दिसतात.’

त्यांच्या या विधानामुळे रामदेव बाबा (Baba Ramdev Controversy) आता चांगलेच अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या संदर्भात बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये आयोग म्हणाले, ‘महाराष्ट्रातील ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी महिलांच्या सम्मान आणि प्रतिष्ठेला ठेस पोहचवणारे वक्तव्य केले आहे. त्याबद्दलची तक्रार आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग या घटनेची दाखल घेत या वक्तव्याचा निषेध करते.’

शिवाय, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने रामदेव बाबांना कलम १२ (२) आणि १२ (३) १९९३ नुसार
त्यांच्या वक्तव्याचा खुलासा देण्यासाठी बोलावले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी
त्यांचा निषेध केला. संजय राऊतांनी रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या अमृता फडणवीसांनाही प्रश्न केला होता.

Web Title :-  Baba Ramdev Controversy | Maharashtra State Commission for Women notice to Ramdev Baba after his statement in Thane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Mumbai Crime | राजघराण्याचा वारस असल्याचे सांगून 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक; गोरेगावातील टिक टॉक ‘हिरो’ला अटक