Babar Azam | बाबर आझमने PSL मध्ये दमदार शतक ठोकून रचला इतिहास; विराट-रोहितला टाकलं मागे

पोलीसनामा ऑनलाईन : Babar Azam | पाकिस्तान सुपर लीगमध्ये शतक ठोकून बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या लीगमध्ये बाबर आझम पेशावार जाल्मी संघाचे नेतृत्व करत आहे. बाबरने क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या विरोधात 115 धावांची खेळी केली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमचे पहिले शतक आहे तर टी 20 मध्ये क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार म्हणून त्याचे हे 8 वे शतक आहे. या एका शतकामुळं बाबरने ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज डेविड वॉर्नर, एरॉन फिंचच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे. वॉर्नर, फिंचने टी-20 मध्ये 8-8 शतक ठोकले आहेत. (Babar Azam)

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने टी-20 मध्ये आतापर्यंत 22 शतके केली आहेत. यानंतर बाबर आझम,एरॉन फिंच, डेविड वॉर्नर आणि मायकल क्लिंगर यांचा नंबर येतो. या चौघांचेही टी 20 मध्ये 8-8 शतक आहेत. ते संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्यानंतर ल्यूक राईट आणि ब्रॅंडन मॅकूलम यांचा नंबर लागतो. या दोघांच्या नावावर 7-7 शतकांची नोंद आहे. या लिस्टमध्ये टी 20 मध्ये सर्वात जास्त शतक ठोकणाऱ्या लिस्टमध्ये केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली 6-6 शतकांमुळं संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. (Babar Azam)

क्वेटा ग्लॅडिएटर्स विरोधात झालेल्या सामन्यात पेशावर जाल्मीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा
निर्णय घेतला. यावेळी बाबर आझम आणि सईम अयुबने पहिल्या विकेटसाठी 162 धावांची भागिदारी केली.
बाबरने 18 व्या षटकात नसीम शाहच्या षटकात आपले शतक पूर्ण केले.
बाबरने या सामन्यात 176 च्या स्ट्राईक रेटने 65 चेंडूत 115धावा केल्या. यामध्ये 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात बाबरच्या शतकी खेळीच्या जोरावर पेशावर जाल्मीने 20 षटकात 2 विकेट गमावत 240 धावा केल्या मात्र तरीदेखील त्यांना हा सामना गमवावा लागला, क्वेटा ग्लॅडिएटर्सने 18.2 षटकात 243 धावा करून हा सामना जिंकला. यामध्ये जेसन रॉयने क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून 43 चेंडूत 145 धावा केल्या.

Web Title :  Babar Azam | babar azam smashes century in pakistan super league sets new t20 cricket record virat kohli and rohit sharma on backfoot watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे