अजून जन्मही झाला नाही ताेच बाळाच्या नावावरून आली घटस्फोटाची वेळ !

लंडन : वृत्तसंस्था – एक महिला सध्या सात महिन्यांची गर्भवती आहे. बाळाचा जन्मही नाही झाला आणि तेच एका जोडप्याचा त्याच्या नावाला घेऊन वाद होताना दिसून आला. यावर एक समझोताही झाला होता तो म्हणजे असा की, ‘पहिल्या मुलाचे नाव नवर्‍याने व दुसर्‍याचे बायकोने ठेवावे.’ दोघांमध्ये मांडिवली झाल्यानंतर वाद तर मिटला होता. मात्र बाळाच्या पित्याने जे नाव सुचवले त्यावरून मात्र महिला भलतीच संतापली. तेच नाव सुचवल म्हणून वाद खूप पेटला आणि अखेर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. त्याने सुचवलेले नाव हे त्याच्या माजी गर्लफ्रेंडच्या नावाशी साधर्म्य असणारे आहे, असा त्याच्या 23 वर्षीय बायकोचा समज झाला आणि म्हणून एवढे सगळे घडले. सोशल मीडियामुळे ही घटना चांगलीच लोकांपर्यंत पसरत असताना दिसत आहे.

ही सर्व घटना घडल्यानंतर या महिलेने स्वतः रेडिटवर सर्व कहाणी कथन केली आहे. घडला प्रकार सांगून तिने लोकांना याविषयी सल्ला विचारला. नवऱ्याने तिला हजारदा सांगितले की ‘आपले तुझ्यावरच प्रेम आहे.’  परंतु काही केल्या तिला हे पटेना. यानंतर मात्र नवऱ्यानेही कडक भूमिका घेतली आहे. होणारे बाळ मुलगी आहे की नाही हेदेखील त्याला माहित नाही. तरीदेखील होणाऱ्या बाळाला आता आपल्या एक्स-गर्लफ्रेंडचेच नाव द्यायचे असा पवित्रा त्याने घेतला आहे. अर्थात त्या अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या आईनेही कोणत्याही स्थितीत हे नाव आपल्या बाळाला ठेवू द्यायचे नाही, असा निर्धार केला आहे.

दोघांच्या या ताठर भूमिकेने आता आमचा घटस्फोट होईल की काय, असे वाटू लागले असल्याचे तिने ‘रेडिट’वर म्हटले आहे. रेडीटवर सर्व प्रकार कथन केल्यानंतर आणि लोकांना सल्ला विचारल्यानंतर अनेकांनी तिला फुकटचे सल्ले द्यायला सुरुवातही केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us