Bachchu Kadu On BJP | ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यास…’, बच्चू कडूंचा भाजपला इशारा

Bachchu Kadu On BJP | BJP decides whether to field candidate Shinde or not; A bunch of bitter kids

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Bachchu Kadu On BJP | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पदावरुन हटवल्यास त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील, त्यांचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. (Bachchu Kadu On BJP)

आमदार बच्चू कडू म्हणाले की, असं होऊ शकत नाही, पण असं झाल्यास भाजपला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कारण एकनाथ शिंदे यांचे देखील 5 ते 10 टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यास तुमचे काही प्लॅन कामी येणार नाहीत. (Bachchu Kadu On BJP)

मराठा आरक्षणानंतर धनगर (Dhangar Reservation) आणि मुस्लिम समाजाला आरक्षण (Muslim Reservation In Maharashtra) मिळावं यासाठी सर्वच समाज आक्रमक झालेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवायला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. कारण ते विकासावर मते घेऊ शकले नाही. आता निवडणुकीत समाजाच्या आरक्षणावर आणि जातीचे मुद्दे घेऊन मते मागितली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

राज्यातील कंत्राटी नोकरभरतीवर मत मांडताना बच्चू कडू म्हणाले, एकीकडे लोक आरक्षण मागत आहेत तर दुसरीकडे
कंत्राटी नोकरभरती केली जातेय. अधिकाऱ्यांच्या कामाचं कधी मूल्यांकन झालं का? तो किती काम करतोय,
पगार प्रमाणे तो काम करतोय का याचं मूल्यांकन झालं का? मग कंत्राटी कामगारांकडून अपेक्षा काय ठेवता?,
असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याबाबत दिले स्पष्टीकरण; कायदेतज्ज्ञांच्या घेतल्या भेटी

Total
0
Shares
Related Posts