Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याबाबत दिले स्पष्टीकरण; कायदेतज्ज्ञांच्या घेतल्या भेटी

पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्णयामध्ये होणाऱ्या दिरंगाईवरुन फटकारले आणि या आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification of MLAs) निर्णय़ाबाबत आत्तापर्यंत झालेली कार्यवाही न्यायालयाला सांगण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हा अहवाल सादर करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अजून 4 दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी नार्वेकर यांनी थेट दिल्ली गाठत अनेक विधीपंडितांशी चर्चा केली आहे. आणि जेष्ठ वकिलांशी सल्लामसलत केली आहे. राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. यावर आता स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दिल्ली दौऱ्याहून परतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, हा पूर्वनियोजित दिल्ली दौरा होता. या दौऱ्यावेळी अनेक भेटी गाठी पूर्वीच ठरल्या होत्या. त्यामध्ये काही कायदेतज्ज्ञांसोबत भेटी होत्या. अपात्रतेसंदर्भातला जो कायदा आहे, त्यात बदल होत राहतात. परिस्थितीनुसार कायद्यात बदल होत असतात, सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका आणि त्यात दिलेले निर्देश, यात अजून काय संशोधन करण्याची गरज आहे किंवा याची अंमलबजावणी योग्यरित्या कशी करायची? यासंदर्भात अनेक तज्ज्ञांसोबत चर्चा झाली असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले यावरुन देखील राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar)
यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी,
त्यापूर्वी आमदार अपात्रतेच्या संदर्भातील सुनावणी 14 तारखेला झाली होती. यानंतरची सुनावणी नियोजित करण्यात
आली होती. येत्या आठवड्यात निश्चितपणे सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच हा विषय न्यायप्रविष्ट आहे.
यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अधिक बोलणे योग्य होणार नाही. संविधानाने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ
आणि कार्यकारी मंडळ यांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिले आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून काम करणे अपेक्षित आहे,
असे राहुल नार्वेकर स्पष्ट केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना, दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना बोलावणार का, असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आला.
यावर, गरज पडली, तर त्यांनाही सुनावणीसाठी बोलावले जाईल, असे उत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar Group | आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘अजित पवार गटाकडून नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू, सही कर नाहीतर…’