Bachchu Kadu | बच्चू कडूंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोकेवाले आमदार म्हणतात हे दु:ख, काही आमदारांनी मला फोन करून…’

मुंबई : भाजपा समर्थक आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि शिंदे गटातील (Shinde Group) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील वादातून 50 खोके एकदम ओक्के प्रकरण आणखी बाहेर आले आहे. बच्चू कडू खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते, असा आरोप राणा यांनी केल्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद सुरू आहे. त्यातच शिंदे गटाचे काही आमदार देखील नाराज असल्याने एकुणच शिंदे-फडणवीसांच्या अडचणी भविष्यात वाढणार असे दिसत आहे. आता पुन्हा एकदा बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना गौप्यस्फोट केला आहे.

बच्चू कडू यांनी गौप्यस्फोट केला की, खोकेवाले आमदार म्हटले जात असल्याने वेदना होतात. शिंदे गटातील 50 आमदारांचे ते दु:ख आहे. त्याबाबत काही आमदारांनी मला फोन करत यातून मोकळे होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

(Bachchu Kadu) बच्चू कडू  म्हणाले, राजकारणात तडजोडी कराव्या लागलात. मात्र, गुवाहाटीला गेल्यानंतर लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. या तडजोडीचे दुष्परिणाम भोगावे लागले. राजकारणात या तडजोडी असतातच. या तडजोडी फार पूर्वीपासून करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही (Chhatrapati Shivaji Maharaj) या तडजोडी केल्या होत्या. मुघलांना शह देण्यासाठी निजामांना हाती पकडावेच लागले.

बच्चू कडू पुढे म्हणाले, टाकीवर चढल्याने आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे. मग भिडू म्हणत होते.
काही ठिकाणी अपंगांचा कैवारी म्हणत होते. आता त्यात खोका आल्याने वेदना होत आहेत.
राजकारणात कोणासोबत गेल्याने पैसेच घेतले, असा त्याचा अर्थ होत नाही.
राणा आधी राष्ट्रवादीच्या (NCP) पाठिंब्यावर निवडून आले.
दुसर्‍या दिवशी त्यांनी भाजपाला (BJP) पाठिंबा दिला.
मग त्यांनी खोके घेतले असे आम्ही म्हणायचे का?

बच्चू कडू यांनी पैसे घेऊन सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडू संतप्त झाले
आहेत. कारण राणा हे भाजपा समर्थक आमदार मानले जातात.
त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे लोकांना वाटू शकते.
म्हणूनच कडू यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे,
अन्यथा कोर्टाची नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.

Web Title :-  Bachchu Kadu | shinde group mla bachchu kadu commented on political compromise of guwahati trip and ravi ranas khoke

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा’; भाजपच्या आमदाराने केली मागणी

Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला धरले जबाबदार, म्हणाले – ‘भाजप सरकार सत्तेवर यायला कोण…’