Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

अमरावती : Bachchu Kadu Targets Navneet Rana | भाजपाच्या (BJP) अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Election 2024) उमेदवार नवनीत राणा यांना पाडण्याचा निर्धार उघडपणे जाहीर केल्यानंतर प्रहार पक्षाचे बच्चू कडू सध्या चर्चेत आहेत. आता बच्चू कडू हे वर्ध्यातून निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. कडू यांच्या ३०० कार्यर्त्यांनी रक्तदान (Blood Donation) करून ही मागणी आपल्या नेत्याकडे केली आहे. आता कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करण्याचा विचार कडू यांनी केला तर ते वर्ध्यातून लढू शकतात.(Bachchu Kadu Targets Navneet Rana)

याबाबत स्वत: बच्चू कडू म्हणाले की, मी वर्ध्यातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मागणी केली आहे की मी वर्धा लढवावे. किमान केंद्राच्या आयात-निर्यात धोरणाविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे. अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे.

बच्चू कडू कार्यकर्त्यांच्या या मागणीवर पुढे म्हणाले की, मी त्यांचा आदर करतो. इतर ठिकाणी बिअर बारमध्ये जाऊन मागण्या केल्या जातात. ही पहिलीच वेळ आहे की कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मागणी केली आहे.

तर अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडण्याच्या निर्धाराविषयी बच्चू कडू म्हणाले,
शुक्रवारी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद होईल. कुणाला सोबत घ्यायचे ते आम्ही ठरवू.
एकतर पाठिंबा द्यायचा की उमेदवार जाहीर करायचा हे तेव्हा ठरेल.

ते पुढे म्हणाले, अभिजीत अडसूळ (Abhijit Adsul) व आमचे टार्गेट एकच आहे. लोकशाहीचे पतन करणारा उमेदवार आमचे
टार्गेट आहे. बाबासाहेबांचे संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा. त्यासाठी ही लढाई आहे.
ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू, असे कडू म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale On Mahayuti | महायुतीला रामदास आठवलेंचा अल्टीमेटम, ”आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत…”

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’