Bal Gandharva Ranga Mandir | बालगंधर्व रंगमंदिर नव्या रूपात, नव्या साजात पुणेकर रसिकांच्या सेवेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bal Gandharva Ranga Mandir | पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या कामासाठी बालगंधर्व रंगमंदिर मागील एक ते दीड महिन्यापासून बंद होते. मात्र आता अतिशय आकर्षक आणि सुंदर रूपात हे रंगमंदीर पुणेकर रसिक प्रेक्षकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा गुरुवार २८ मार्चपासून दिमाखात सुरू झाले आहे.

रंगमंदिरीच्या इमारतीसमोरील म्यूरल, भिंतींची रंगरंगोटी, व्हीआयपी रूम, मेकअप रूम, बैठक व्यवस्था इत्यादी बदल करण्यात आला आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराला नवी झळाळी मिळाली आहे.

डागडुजी नसल्याने रंगमंदिराची दुरवस्था झाली होती. याचा त्रास नाट्यकर्मींसह प्रेक्षकांना देखील होत होता. या दुरावस्थेची दखल तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेऊन तातडीने दुरूस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार, बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले होते.

रंगमंदिराच्या परिसरात हिरवळ आणि झाडांची सजावट करण्यात आली आहे.
झाडांच्या आजूबाजूला सुशोभीकरण केल्याने रंगमंदिर आकर्षक दिसत आहे.
रंगमंदिराच्या समोरील परिसरात विविध कलाकृती उभारण्यात येणार आहेत. अजून बरेच काम पूर्ण व्हायचे आहे.
आतील रंगमंदिराचे काम पूर्ण झाले आहे.

या बाबत प्रतिक्रिया देताना महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराची
दुरुस्ती करण्यासाठी पालिकेचे सल्लागार, ज्येष्ठ कलावंत यांच्या बैठका घेऊन चर्चा करायचो.

त्यानुसार आम्ही बालगंधर्व रंगमंदिराचे सुशोभीकरण कसे करता येईल, यावर चर्चा केली.
व्हीआयपी रूममध्ये ज्येष्ठ कलावंत बसतात. त्यांच्यासाठी खास रूम असावी म्हणून तिथे विशेष बैठक व्यवस्था केली.
पडदे बदलले, अशी माहिती ढाकणे यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास