Balasaheb Thorat | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर इंदुरीकर महाराजांची स्तुतीसुमने; म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Balasaheb Thorat | काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या गोंधळामुळे चर्चेत असलेले काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते यांच्यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत असतानाच समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराजांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची स्तुती केली आहे. आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj) किर्तन ठेवण्यात आले होते. त्यावेळी बोलताना इंदुरीकर महाराजांनी विविध अध्यात्मिक दाखले दिले. यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यावर बोलताना त्यांनी थोरात साहेब हे एक सर्वसामान्य नेतृत्व आहे. संगमनेर तालुका व जिल्ह्यासाठी हा माणुस आपला स्वाभिमान आहे. असे यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले.

आज बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील हरीबाबा मित्रमंडळाच्या वतीने किर्तन सप्ताह आयोजीत करण्यात आला. त्याची सांगता आज झाली. यावेळी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe), रणजीतसिंह देशमुख (Ranjit Singh Deshmukh), कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात (Dr. Jayashree Thorat), जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत (Sitaram Raut), अजय फटांगरे (Ajay Phatangre), आयोजक तानाजी शिरतार (Tanaji Shirtar), रमेश जेडगुले (Ramesh Jadegule), व्यंकटेश महाराज सोनवणे (Venkatesh Maharaj Sonwane), वैजयंती शिरतार (Vaijayanti Shirtar) कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर (Jagannath Ghugarkar) उपस्थित होते. यावेळी केक कापून आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कीर्तनादरम्यान इंदुरीकर महाराज म्हणाले की, ‘अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकाने शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या फॅशनच्या नावावर चाललेले संस्कृतीचे विद्रूपीकरण अत्यंत दुर्दैवी आहे. वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण व अपघाताचे प्रमाण ही मोठी चिंताजनक बाब आहे. चांगला आहार असेल तर माणूस निरोगी राहतो. यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आहारात जास्त घेतल्या पाहिजे. याचबरोबर अपघात टाळण्यासाठी व्यसन करू नये. असा सल्ला उपस्थितांना यावेळी इंदुरीकर महाराजांनी दिला.

यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन
केले. यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात,
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी संगमनेरचे नाव
राज्य पातळीवर नेले आहे. सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी वेल्हाळे, मालदाड, घुलेवाडी
यांसह परिसरातील भाविक दररोज मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते.

तर यावेळी बोलताना सत्यजीत तांबे यांनी राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर देखील टीका केली.
यावेळी ते म्हणाले, ‘बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांना विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा देण्याची
वेळ आली आहे. याबाबत काँग्रेस पक्षाने आत्मचिंतन करायला हवे. असे यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले.
शंभर वर्ष निष्ठेने एका पक्षाबरोबर राहिलेले जे परिवार आहेत, अशा लोकांवर ही वेळ का येते याबाबत काँग्रेस
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. असे देखील यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले.

Web Title :- Balasaheb Thorat | Indurikar Maharaj’s eulogy on Congress leader Balasaheb Thoratan; said…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांचा डोंबाऱ्याचा खेळ;’ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर घणाघात

Nitin Deshmukh | ठाकरे गटाच्या आमदाराने राणे समर्थकाला दिलेला शब्द पाळला; सांगितल्याप्रमाणे नितीन पाटील नरीमन पॉईंटवर आले अन्…

Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ताच्या म्हाळसा लूकने चाहते घायाळ; फोटोवर कौतुकांचा वर्षाव