Baldness | टक्कल पडण्याची समस्या का होते? जाणून घ्या याची कारणे आणि बचावाच्या पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Baldness |वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होतात. वयाचा परिणाम केसांवरही दिसून येतो. अनेकदा वृद्धत्वामुळे स्त्री आणि पुरुष दोघांचेही केस गळतात. पण आजकाल लोक वयाच्या आधीच टक्कल पडण्याच्या समस्येला बळी पडत आहेत. केस गळण्याची किंवा टक्कल पडण्याची (Baldness) अनेक कारणे आहेत – जसे की वाढते प्रदूषण, खाण्याच्या खराब सवयी आणि तणाव. यामुळे वयाच्या आधीच केस गळायला लागतात.

 

सुप्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आणि स्किन केअर क्लिनिकचे संस्थापक डॉ. बी. एल. जांगिड (Dr. BL Jangid, a well-known hair transplant surgeon and founder of Skin Care Clinic) यांच्या मते, टक्कल पडणे (baldness) हे वयानुसार सामान्य आहे. टक्कल पडण्यासाठी कौटुंबिक इतिहास देखील महत्त्वाचा आहे.

 

ते म्हणतात की महिला आणि पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करते. जर तुम्हीही गळणारे केस किंवा टक्कल पडल्यामुळे त्रस्त असाल तर केस तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. महिला आणि पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे कारण काय जाणून घेवूयात…

 

पुरुष आणि स्त्रियांमध्ये टक्कल पडणे :
50 वर्षांनंतर पुरुषांना केस गळण्याची किंवा टक्कल पडण्याची तक्रार असते, तर स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर केस गळण्याची समस्या असते.

 

या काळात महिलांना पूर्ण टक्कल पडत नाही, पण केस गळण्याची त्यांची तक्रार असते. केस पातळ झाल्यामुळे त्यांची टाळू दिसू लागते. केस गळणे हे एंड्रोजन हार्मोन्समुळे होते. एंड्रोजेनेटिक अलोपेसिया (एजीए) मध्ये केस गळण्याची लक्षणे फारशी स्पष्ट नाहीत. (Baldness)

सिकाट्रिकियल एलोपेसिया :
Cicatricial alopecia म्हणजे त्वचेवर डाग पडतात आणि केस कायमचे गळतात. कायमचे केस गळण्याची मुख्य कारणे म्हणजे लाइकेन प्लानोपिलारिस, जळजळ, संसर्ग आणि जन्मजात स्थिती.

 

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रकार

1. एलोपेशिया एरिटा – लहान गोल आकाराचे टक्कल.

2. ट्रॅक्शन एलोपेशिया – वेगवेगळ्या केशरचना केल्याने देखील केस गळू शकतात.

3. टिनिया कॅपिटिस – एक बुरशीजन्य संसर्ग.

 

महिलांमध्ये टक्कल पडण्याचे प्रकार :

1. एंड्रोजेनेटिक अलोपेसिया – डोक्यावरील सर्व भागांवर केस पातळ होतात.

2. टेलोजन इफलूव्हीयम – हे बाळंतपण, जास्त ताण, मोठे संक्रमण यांसारख्या कारणांमुळे होते.

3. अ‍ॅनाजेन इफ्लुव्हियम – हे केमोथेरपीमुळे होऊ शकते.

4. अलोपेसिया अरेटा – हे इम्युनिटी सिस्टमधील इफ्लामेटरी रिअ‍ॅक्शन झाल्याने होते.

5. ट्रॅक्शन एलोपेशिया – केसांच्या स्टाईलमुळे केसांचे कूप ताणले जाणे.

 

टक्कलाची चाचणी कशी करावी :
या समस्येवर उपचार घेण्यासाठी सर्वप्रथम चाचणी घेणे आवश्यक आहे. हे तपासण्यासाठी ट्रायकोग्रामा, ट्रायकोस्कोपी, हार्मोनल पातळी आणि स्कॅल्प बायोप्सी यासारख्या विविध चाचण्या उपलब्ध आहेत. या सर्व चाचण्या केसांच्या समस्येचे निदान करण्यात मदत करतात.

 

टक्कल पडणे असे टाळा (How to prevent baldness) :

1. टक्कल पडू नये म्हणून जीवनशैलीत बदल करा.

2. टाळूला मसाज करा. मसाज केल्याने केसांना पोषण मिळते आणि केस लवकर येतात.

3. चांगला आहार घ्या. संतुलित आहार तुमच्या केसांवरही उपचार करतो.

4. तणावापासून दूर राहा. तणावामुळे टक्कल पडतेच, शिवाय केस पांढरे होतात आणि गळतात.

 

Web Title :- Baldness | whats a baldness in mail and female know the symptoms and cure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Vyapari Mahasangh | व्यापाऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांची प्रतिक्रिया

 

Casting Couch | अंकिता लोखंडेपासून तर दिव्यांका त्रिपाठीपर्यंत ‘या’ 6 अभिनेत्र्या झाल्यात कास्टिंग काऊचच्या शिकार; जाणून घ्या त्यांचे अनुभव

 

Shabana Azmi Tests Positive For COVID-19 | सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना अझमीला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करून सांगितली अवस्था