#Video : ‘या’ डिझायनरने तयार केले ‘असे’ BALOONS ज्याचे होते कपड्यात रुपांतर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जेव्हा जेव्हा फॅशनचा विषय असतो तेव्ही डीझायनर एक पाऊल पुढे असतात. फॅशन डिझायनर कपड्यांसोबतच इतरही गोष्टींमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. त्यात काही अशाह गोष्टींच समावेश असतो जे आपण कधीच पाहिलेले नसतात. कपडे असो वा अ‍ॅक्सेसरीज मागील काही काळापासून आपण अनेक वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीज पाहिल्या असतील. मागील आठवड्यात लंडनमध्ये सेंट्रल सेंट मार्टिंस बीए फॅशन शो २०१९ मध्ये एक विचित्र फॅशन पाहायला मिळाली.

नॉर्वेजियन डिझायनर फ्रेड्रिक तजेरंडसेने आपल्या नवीन टेक्नीकने काही अनोखे ड्रेस सादर केले. यावेळी सहभागी सर्व मॉडेल हे बलून ड्रेसमध्ये दिसून आले. या शोमधील या बलून ड्रेसचे अनेक व्हिडीओदेखील समोर आले आहे. सध्या हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक मॉडेलने असे ड्रेस घातले होते ज्याचं बलूनमध्ये रुपांतर होत होतं.

View this post on Instagram

Wonder @fredriktjaerandsen

A post shared by TianweiZhang (@tianweizhang) on

अनेक मॉडेलने मोठमोठे बलून परिधान करत रॅम्प वॉक केलं होतं. आणि नंतर काही वेगळंच पाहायला मिळालं. नंतर हे सर्व बलून कपड्यांमध्ये बदलले. बलून्सचं कपड्यात होणारं रुपांतर पाहून तेथे उपस्थित लोक मात्र चकित झाल्याचे दिसून आले. अनेकजण हे पाहून बुचकळ्यात पडले. काहींना हा प्रयोग आवडल्याचेही पाहायला मिळाले.

 

Loading...
You might also like