अहमदनगर : अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बाळू बेर्डेला मरेपर्यंत जन्मठेप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याच्यार करणाऱ्या नराधम बाळू गंगाधर बेर्डेला (रा. राहुरी) जिल्हा सत्र न्यायालयाने आज (मंगळवार) मरेपर्य़ंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना डिसेंबर २०१६ मध्ये रेल्वे स्टेशन परिसरात घडली होती.

आरोपी बाळू बेर्डेने डिसेंबर २०१६ मध्ये रेल्वे स्टेशन परिसरातून पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला होता. या घटनेमुळे शरीराला आतून गंभीर इजा झाल्याने तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. आरोपीबाबत कोणतीही माहिती नसतानाही कोतवाली पोलिसांनी सखोल तपास करून बाळू गंगाधर बर्डे यास संशयित म्हणून अटक केली होती. बर्डेविरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8610b7e4-9a25-11e8-a550-a161e2f43deb’]
खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी काम पाहिले. न्यायालयाने शुक्रवारी सायंकाळी आरोपी बर्डे यास अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. या प्रकरणात ‘पुढारी’ने सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता.