या क्रिकेटपटू वर वर्षभरासाठी बंदी ..!

वृत्तसंस्थाः
श्रीलंकेचा लेग स्पिनर जेफ्री वेंडरसेला एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसेच त्याला  त्याच्या वार्षिक फिच्या २० टक्के दंड सुद्धा आकारण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f5027ab-8cef-11e8-a29f-8d5beb35d9e5′]

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, दुसरी टेस्ट ड्रॉ झाल्यावर  वेंडरसे आणि इतर तीन खेळाडू सेंट लूसियामध्ये नाइट क्लबला गेले. दुसऱ्या दिवशी २८ वर्षाचा हा क्रिकेटर आपल्या रुममधून बाहेर न आल्याने टीम मॅनेजमेंटने पोलिसांत तक्रार केली. मात्र जेफ्री ने सांगितले कि ‘नाइट आऊट’ केल्यानंतर परताना आपल्याला बाकीचे खेळाडू नाइट क्लबमध्ये सोडून आल्याने आपण रस्ता विसरल्याचे कारण देत हॉटेलमध्ये पोहचायला वेळ लागला असे वेंडरसेने टीम मॅनेजमेंटला सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर बारबडोसमध्ये होणाऱ्या तिसरी टेस्ट मॅच खेळायची बंदी घालण्यात अली आहे.

वेंडरसेचा कॅरेबियन दौरा २३ जून ला संपणार होता पण कमेटीने टूरवरील टीम मॅनेजर, असंका गुरूसिंहा यांचा रिपोर्ट वाचल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातूनही त्याला डच्चू देण्यात आलायं.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44c62a83-8cef-11e8-b33b-8ddba22073f1′]

वादात सापडलेला जेफ्री वेंडरसेलः
वेंडरसेने खेद व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर निलंबन आणि दंडात्मक कारवाई केली गेली. आणि त्या सोबतच  नियम तोडल्यास कडक कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. वादात अडकण्याचं वेंडरसेच हे काही नवं नाही,.गेल्यावर्षी भारत दौऱ्याआधी स्थानिक मॅचमध्ये न खेळल्याने त्याला वॉर्निंगही दिली गेली होती.