Bank Account Nominee | तुमच्या बॅंक अकाऊंटला वारसदाराची नोंद आहे का? ‘या’ स्टेप्स फॉलो करुन, घरबसल्या करा नोंदणी
पोलीसनामा ऑनलाइन – Bank Account Nominee | प्रत्येकजण बॅंकेमध्ये आपले पैसे सुरक्षित सेव्हिंगसाठी जमा करत असतो पण त्या प्रत्येक अकाऊंटला वारसदाराचे नाव नोंदणी करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. वारसदाराचे नाव नोंदणीबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काही निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक खातेदाराच्या नॉमिनीचे नाव आणि पत्ता रेकॉर्डमध्ये असणे आवश्यक असल्याचे अर्थमंत्र्यांनी बँक आणि वित्तीय संस्थांना सांगितले आहे. जर कोणत्या खातेदाराने नॉमिनी (Bank Account Nominee) नोंदणी केली नसेल तर त्यांना बॅंकेने नॉमिनी नोंदणीबाबत सूचना द्याव्यात असे सांगण्यात आले आहे.
देशामध्ये हजारो करोड रुपयांची रक्कम ही बेवारस म्हणून बॅंकांमध्ये (Bank Inheritance Amount) पडून आहे. असे खातेदार ज्यांचे बॅंकेमध्ये खाते आहे पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कोणालाही वारसदार न लावल्यामुळे ही रक्कम बॅंकेकडे पडून आहे. देशभरातील बॅंकांची बेवारस रक्कम म्हणून 35,000 कोटी रुपये अशी मोठी रक्कम आहे. याबाबतचा तपशील लोकांना ऑनलाइन पाहता यावा आणि बॅंकेमध्ये असणारी ही बेवारस रक्कम कमी व्हावी यासाठी आरबीआयने (Reserve Bank of India) काही दिवसांपूर्वी उदगम पोर्टल (UDGAM) लाँच केले आहे.
यावरुन एसबीआय (SBI), पीएनबी (PNB), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), धनलक्ष्मी बँक (Dhanlaxmi Bank), साउथ इंडियन बँक (South Indian Bank), डीबीएस बँक इंडिया (DBS Bank India) आणि सिटी बँक (Citi Bank) या बॅंकेतील वारसदार नसलेले अकाऊंट शोधता येते. मात्र यावर अजून काही बॅंकेचा डेटा भरण्यात आलेला नाही. आता मात्र ऑनलाइन देखील बॅंकेतील खात्यांना नॉमिनी लावता येणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो केल्या तर ऑनलाइन पद्धतीने (Online Process For Account Nominee) घर बसल्या वासरदार लावता येणार आहे.
नेट बॅंकिंगच्या (Net Banking) सहाय्याने देखील वासरदार लावता येतो. त्यासाठी काही स्टेप्स आहेत.
- सगळ्यात पहिले www.onlinesbi.com वर जा आणि युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- आता मेनूमधील Request & Enquiries या टॅबवर क्लिक करा.
- यानंतर Online Nomination टॅबवर क्लिक करा.
- आता तुमचे बचत खाते/एफडी निवडा ज्यामध्ये तुम्हाला नॉमिनी जोडायचा आहे, आता नेक्स्ट वर क्लिक करा.
- यानंतर, नॉमिनीचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि खातेदाराशी असलेले नाते एंटर करा.
- प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
अशा अगदी काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर नेटबॅंकिंगच्या सहाय्याने वारसदार लावता येणार आहे.
त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना देखील मोबाईल ॲप मधून देखील वारसदार लावता येतो. त्यासाठी मोबाईलमध्ये YONO हे ॲप्लिकेशन (YONO Application) डाऊनलोड करावे लागले.
- हे YONO ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आवश्यक तपशील भरुन लॉग इन करावे.
- त्या ॲपमधील Services And Request या ऑप्शनवर जावे.
- तिथे तुम्हाला Account Nominee हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यामध्ये Manage Nominee या पर्यायावर क्लिक करा.
- येथे ड्रॉप डाउन वर जा आणि तुम्हाला ज्या खात्यासाठा नॉमिनीचे नाव जोडायचे आहे ते खाते निवडा.
- यानंतर, तुम्ही वासरदार व्यक्तीचे नाव आणि बाकीचा तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
या प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या YONO ॲपद्वारे देखील घरबसल्या वारसदाराची नोंदणी करता येते.
बॅंक खात्याला वारसदार (Bank Account Nominee) लावणे हे महत्त्वाचे आहे. तुमच्या शाखेमध्ये जाऊन देखील वारसदार लावता येतो. बॅंक खात्याला नॉमिनी जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करा. त्याच्यामध्ये विचारण्यात आलेला तपशील भरा. आणि तुमच्या होम ब्राँचमध्ये सबमिट करा.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा