Bank Holidays | ऑगस्टमध्ये आहेत अनेक सण, 17 दिवस बँका राहणार बंद, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी तपासून पहा सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays | ऑगस्ट महिन्याला सणांचा महिना म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन (Rakshabandhan 2022), जन्माष्टमी (Janmashtami 2022), गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) आणि पारसी नववर्ष तसेच स्वातंत्र्य दिन (Independence Day 2022) सारखे मोठे सण आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट महिन्याच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी जाहीर केली आहे.

 

पुढील महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑगस्टमध्ये बँकेशी संबंधित काही काम असेल तर सुट्ट्यांची (Bank Holidays List 2022) माहिती जरूर घ्या. ज्या दिवशी तुम्ही बँकेत जाल, त्या दिवशी बँक बंद असेल आणि तुम्हाला परतावे लागेल, असे होऊ नये.

 

राज्यांप्रमाणे सुट्ट्या
हे लक्षात घ्या की या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर देखील अवलंबून असतात. त्यामुळे संपूर्ण देशातच ऑगस्ट महिन्यात 17 दिवस बँका काम करणार नाहीत असे नाही.

 

ही आहे सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in August 2022)

1 ऑगस्ट 2022 – द्रुपका शे-जी उत्सव (गंगटोकमध्ये बँका बंद राहतील)

7 ऑगस्ट 2022 – पहिला रविवार

8 ऑगस्ट 2022 – मोहरम (जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल)

9 ऑगस्ट 2022 – चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलाँग वगळता देशभरात बँका बंद राहतील.

11 ऑगस्ट 2022 – रक्षाबंधन (अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, जयपूर शिमल्यात सुट्टी असेल)

12 ऑगस्ट (कानपूर लखनऊमध्ये बँकांमध्ये कामकाज होणार नाही)

13 ऑगस्ट 2022 – दुसरा शनिवार

14 ऑगस्ट 2022 – रविवार

15 ऑगस्ट 2022 – स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट 2022 – पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये बँक हॉलिडे)

18 ऑगस्ट 2022 – जन्माष्टमी (भुवनेश्वर, कानपूर, डेहराडून, लखनौ येथे बँकांना सुट्टी असेल)

19 ऑगस्ट 2022 (अहमदाबाद, भोपाळ, चंडीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील)

20 ऑगस्ट 2022 – हैदराबादमध्ये बँका बंद राहतील.

21 ऑगस्ट 2022 – रविवार.

28 ऑगस्ट 2022-रविवार.

29 ऑगस्ट (गुवाहाटीमध्ये सुट्टी).

31 ऑगस्ट 2022 – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील).

 

Web Title :- Bank Holidays | bank holidays bank holidays in augest 2022 bank holidays list 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO Update | नोकरदार लोकांना मिळतील 81,000 रुपये, जाणून घ्या तारीख आणि चेक करण्याची पद्धत

 

Pune Crime | महिलेने 73 वर्षाच्या ज्येष्ठाकडे मागितली 20 लाखांची खंडणी; विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा

 

Umesh Kolhe Murder Case | अमरावती येथील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर आर्थर रोड जेलमध्ये हल्ला