Bank Loan | ग्राहकांना महा फटका! या तीन बँकांचं कर्ज महागलं, EMI आणि व्याजदरही वाढला

मुंबई : Bank Loan | रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) चलनविषयक धोरण समितीची अतिरिक्त आढावा बैठक 3 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, तत्पूर्वी देशातील 3 प्रमुख बँकांनी त्यांचे कर्जदर मोठ्या प्रमाणात महाग केले आहेत. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि बँक ऑफ इंडियाने (Bank of India) त्यांच्या कर्जदरात (Bank Loan) 15 बेसिस पॉईंट्स ते 30 बेसिस पॉइंट्सच्या दरम्यान वाढ केली आहे. ही दरवाढ खुपच जास्त असून ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

रिझर्व्ह बँकेने सलग चार वेळा रेपो दरात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ केली आहे, त्यानंतर बँकांनी कर्जाचे दर वाढवले आहेत. तसेच अनेक टप्प्यांत हळूहळू वाढ होते. डिसेंबरच्या तिमाहीतही रिझर्व्ह बँक कर्जाचे दर वाढवू शकते, अशी भीती आहे. यासाठी बँका आधीच वाढीच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करत आहेत. तिन्ही बँकांचे नवे दर 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

इतके वाढले व्याजदर –

ICICI बँकेने एमसीएलआरवर आधारित कर्ज दर 20 बेसिक पॉइंट्सनी (0.2 टक्के) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीनंतर एक वर्षाचा एमसीएलआर 8.1 टक्क्यांवरून 8.3 टक्के झाला आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांचा एमसीएलआर 8.05 टक्क्यांवरून 8.25 टक्के झाला आहे.

पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाने देखील एमसीएलआर वाढवण्याची घोषणा केली आहे. पीएनबीने सर्व मुदतीसाठी एमसीएलआर 0.30 टक्क्यांनी वाढवला आहे तर बीओआयने हा दर 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. (Bank Loan)

नवीन एमसीएलआर दर 1 नोव्हेंबरपासून लागू होतील. एक वर्षाच्या मुदत कर्जाचा दर 7.75 टक्क्यांवरून 8.05
टक्के करण्यात आला आहे. इतर सर्व मुदतीसाठी कर्ज दर 7.40 ते 8.35 टक्के करण्यात आला असल्याची माहिती
पीएनबीने दिली आहे.
तर बँक ऑफ इंडियाचा वार्षिक कर्ज दर 1 नोव्हेंबरपासून 7.95 टक्के असेल,
जो आतापर्यंत 7.80 टक्के होता. इतर सर्व मुदतीसाठी कर्जदरात 0.10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

महागाई आटोक्यात येत नसल्याने यावर चर्चा करण्यासाठी 3 नोव्हेंबरपासून एमपीसीची बैठक होत आहे.
नियमांनुसार, जर महागाई दर सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेच्या तीन चतुर्थांश बाहेर राहिला,
तर रिझर्व्ह बँकेला याचे कारण सरकारला सांगावे लागते. सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या
दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
मात्र, सलग तीन तिमाहीत महागाईचा दर 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे.

Web Title :-  Bank Loan | the loans of icici bank pnb bank of india banks became expensive know how much interest rates have increased

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा शरद पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘गरिबाच्या पोरीचं प्रेम म्हणजे ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीचं प्रेम म्हणजे…’

Pune Crime | दरमहा 15 टक्के दराने व्याज घेणारा सावकार आणि वसुली करणाऱ्यावर खंडणी विरोधी पथक-2 कडून FIR