Bachchu Kadu | बच्चू कडूंचा शरद पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘गरिबाच्या पोरीचं प्रेम म्हणजे ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीचं प्रेम म्हणजे…’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहटीला जाण्यासाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पैसे घेतले, असा थेट आरोप भाजपा (BJP) समर्थक बडनेराचे आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी केला होता. यानंतर या दोन आमदारांमधील वाद चांगलाच धगधगत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राणांच्या आरोपावर स्पष्टीकरण द्यावे अन्यथा त्यांनाही नोटीस पाठवणार असा इशारा सुद्धा कडू यांनी दिला होता. परंतु काल शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर आमदार राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली आणि या वादावर पडदा अखेर पडला. यानंतर कडू (Bachchu Kadu) यांनी अमरावतीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत पाच खोके एकदम ओक्के, असे आरोप करणार्‍या विरोधकांवर निशाणा साधला.

 

बच्चू कडू आपल्या भाषणात म्हणाले, राजकारण हे राजकारणासारखे करावे लागेल आणि तत्त्व ही तत्त्वांसारखी पाळावी लागतील. या दोन्ही गोष्टींची सांगड घालावी लागेल. केवळ तत्त्व पाळत राहिलो आणि काम काहीच केले नाही, तर त्या तत्त्वांना किंमत उरत नाही. लोकांच्या दु:खावर कुठेतरी मलमपट्टी करता आली पाहिजे. आम्ही उगीच गुवाहाटीला गेलो नाही. तेव्हा मी राज्यमंत्री होतो. मंत्री असतानाही मला गुवाहाटीला जाण्याची गरज काय होती. मी ज्या शेवटच्या घटकासाठी उभा राहिलो, तो घटक महत्त्वाचा आहे.

 

कडू (Bachchu Kadu) पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) 1938 मध्ये काँग्रेसला ‘जळते घर’ म्हटले होते. काँग्रेसशी (Congress) मैत्री म्हणजे ‘मुंगूस आणि सापाची’ मैत्री असेही ते म्हणाले होते. तरीही बाबासाहेबांची तत्त्व महत्त्वाची होती. राजकारणात उलटापालट होऊ शकते. पण मी ज्या शेवटच्या घटकासाठी उभे राहिलो तो घटक महत्त्वाचा आहे. त्याचे खरे स्वातंत्र महत्त्वाचे आहे. ही सगळी सत्ता त्या वंचितांपर्यंत नेण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना ‘जळते घर’ म्हटले त्यांच्यासोबतच बाबासाहेब बसले आणि संविधान समितीचे सदस्य झाले. यानंतर त्यांनी घटना तुमच्या हाती दिली. निर्णय कडू असले तरी काम गोड करता आले पाहिजे.

बच्चू कडू म्हणाले, शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) तर कित्येकदा तह केले.
माझ्या शेतकर्‍यांच्या पिकाच्या देठालाही हात लागता कामा नये, या भावनेतून जेव्हा छत्रपतींनी म्यानातून तलवार बाहेर काढली, तेव्हा त्यांनी तत्त्वांशी कुठेही तडजोड केली नाही.
कधी आदिलशहा तर कधी मुघलांनासोबत घेऊन महत्त्वाचे ध्येय साध्य केले.
याला तुम्ही बंडखोरी म्हणता का? हा उठाव आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) 2014 मध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला.
तो त्यांच्यासाठी सोयीचा होता. पण तेव्हा कुणीही बोलले नाही.
गरिबाच्या पोरीने प्रेम केले तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीने प्रेम केले तर त्यांचे ‘लव्ह मॅरेज’…
आमचाही उठाव होता, हम छोटे हैं लेकीन दिलदार है,
असे म्हणत बच्चू कडू यांनी आपल्या बंडखोरीचे समर्थन केले आणि टीका करणारांना सुनावले.

 

Web Title :- Bachchu Kadu | bachchu kadu live speech in amravati sharad pawar support to bjp in 2014

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrapur ACB Trap | 2 लाखाची लाच घेताना सार्वजनिक बंधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Arvind Sawant | मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देखील चौकशी झाली पाहिजे – अरविंद सावंत

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे मिशन 40! शिंदे गटाच्या आमदारांना शह देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात