जोडप्याच्या बँक खात्यात जमा झाले 86 लाख, ‘शॉपिंग’मध्ये उडवल्यानंतर पुढे झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एका जोडप्याच्या बँक खात्यात अचानक 86 लाख रुपये जमा झाले आणि त्यांनी ते खर्च देखील केले. ही घटना पेन्सिलवेनिया येथे घडली. बँकेला या बद्दलची कोणतीही माहिती न देताच त्यांनी सर्वच्या सर्व पैसे खर्च केले. 
या जोडप्याच्या बँक खात्यात बँकेने चूकुन 120,000 डॉलर (86 लाख रुपये) सेंड केले. पोलिसांच्या मते, जोडप्याने बँकेला या संबंधित कोणतीही माहिती दिली नाही आणि पैसे खर्च केले.
 
न्यायालयात दाखल तक्रारीनुसार मॉन्टोर्सविलमध्ये राहणाऱ्या रॉबर्ट आणि टिफिनी विलियम्सने बँक खात्यात चूकुन आलेले पैसे खर्च केले.  टिफनी विलियम्स यांनी एका मुलाखतीत म्हणले आहे की, एक एसयूव्ही, एक कँपर, दोन कार आणि एक कार ट्रेलर आणि इतर अनेक वस्तूंची खरेदी केली. 
 
BB&T बँकेने 31 मे ला चूकुन एका ग्राहकाच्या खात्यात 120,000 डॉलर डिपॉजिट केले. खरंतर हे पैसे ज्या खातेधारकांचे होते त्यांनी बँकेशी संपर्क साधल्यावर कळाले की, विलियम्स आणि त्यांच्या पत्नीच्या ज्वाइंट खात्यावर हे पैसे ट्रान्सफर झाले.
 
टिफिनी विलियम्सला बँकेने जेव्हा संपर्क केला तेव्हा त्यांनी माहिती दिली की त्यांनी हे पैसे खर्च केले. तर 15,000 डॉलर गरजू मित्रांना दिले.

या कपलच्या शेजारच्यांनी सांगितले की, त्यांच्यावर झालेले आरोप अत्यंत धक्कादायक आहे, शेजारी वीवर यांनी सांगितले की, बँकेने जी प्रक्रिया केली त्याची चेकिंग होत राहते, त्यानंतर देखील 2 – 3 दा चेकिंग होते, त्यात कोणताही खर्च वाचू शकत नाही. परंतू 25,000 डॉलर भरुन पुन्हा रक्कम जमा करण्यासाठी जामीन देण्यात आला.