मुंबईत सुरु होणार बँक ऑफ चायनाची शाखा 

बीजिंग : वृत्तसंस्था

भारतामध्ये चायना मेड वस्तु आणि खाद्यपदार्थ रोजच्या जीवनातील घटक बनले आहेत. आता भारतातील  बँकिंग क्षेत्रात देखील चीन प्रवेश करणार आहे. भारतात  बँक ऑफ चायनाची शाखा सुरु होणार आहे. हिंदुस्तानात व्यवसाय सुरु करण्यासाठी बँक ऑफ चायना ने परवाना मागितला होता . आता भारतीय रिझर्व्ह बँकेने हा परवाना मंजूर केला असून या बँकेची पहिली शाखा मुंबईत सुरु होणार आहे.

आता भारतातील  बँकिंग क्षेत्रात चायना बँकेची भर पडणार आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारतात व्यवसाय परवाना दिला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार यासंबंधीचा  परवानगीसंदर्भातला सिक्युरिटी क्लिअरन्स अर्ज २०१६ मध्ये करण्यात आला होता.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40fd6aa5-80f6-11e8-94e3-f7d33832a938′]
भारतात व्यवसाय करणारी बँक ऑफ चायना ही दुसरी चिनी बँक आहे. चायनाची सरकारी बँक हाँगकाँग ऍण्ड शांघाय स्टॉक एक्स्चेंजवर अगोदरच लिस्ट झाली आहे. बँक ऑफ चायनानंतर हिंदुस्थानात व्यवसाय करणाऱ्या विदेशी बँकांची संख्या ४६ वर गेली आहे. युकेची स्टॅण्डर्ड चार्टर्ड ही हिंदुस्थानातील सर्वाधिक १०० शाखा असलेली विदेशी बँक आहे.

बँक ऑफ चायनाची मार्केट कॅप १०.८४ लाख कोटी आहे. या बॅकेवर इस्रायलवर दहशतवादी हल्ले करणाऱ्या हमास या संघटनेला फंडिंग केल्याचा आरोप होता. या आरोपामुळे या बँकेला परवाना मिळण्यास उशीर झाला. इराणच्या ३ दक्षिण कोरियाच्या २ तर नेदरलॅण्ड आणि मलेशियाच्या प्रत्येकी एका बँकेने हिंदुस्थानात शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बॅकेकडे परवानगी मागितली आहे, पण त्यावर अजून निर्णय झालेला नाही.