BOI मध्ये असिस्टंन्ट, अटेंन्डन्ट आणि वॉचमन भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॅक ऑफ इंडियामध्ये केवळ 8 वी आणि 10 वी पास तरुणासाठी नोकरी मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. असिस्टंन्ट, अटेंन्डन्ट आणि वॉचमन अशा 5 पदांसाठी बॅंक ऑफ इंडियाने जाहिरात प्रसिध्द केली आहे. बॅंकेने कोलकाता झोनल ऑफिस अंतर्गत ॲग्रीकल्चर फाइनान्स ॲन्ड फाइनांशियल इन्क्लूजन डिपार्टमेंटमध्ये रूरल सेल्फ- एम्पलॉयमेंट ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स साठी ही जाहीरात प्रसिध्द केली आहे.

या पदासाठी अर्ज भरण्यास 4 मार्चपासून सुरुवात झाली असून 22 मार्च ही शेवटची तारीख आहे. यात ऑफिस असिस्टन्ट -2 पदे, अटेन्डेन्ट -1 पद, वॉचमन -1 पद, फॅकल्टी- 1 पद अशा एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. ऑफिस असिस्टंन्ट या पदासाठी उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा. तर वॉचमॅन पदासाठी उमेदवार 8 वी पास असावा. तर फॅकल्टी आणि अटेंन्डन्ट साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डीग्री हवी.

वयोमर्यादा : फॅकल्टी या पदासाठी 25 से 65 वर्ष, अटेंन्डन्ट – 18 से 45 वर्ष वय असणे गरजेचे आहे. अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in ला भेट द्यावी.