‘बँक आॅफ महाराष्ट्र’ ने आपल्या ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंद होणाऱ्या सर्व शाखा शहरी भागातील असल्याची माहिती पुणे मुख्यालयातून देण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f4007f6-c796-11e8-9961-b9194db9647b’]
‘बँक आॅफ महाराष्ट्र’च्या देशभरात १ हजार ९०० शाखा आहेत. यापैकी शहरी भागात असलेल्या ५१ शाखांमधून बँकेला कोणताही फायदा होत नाही, त्यामुळे या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आल्याची माहिती बँकेच्या मुख्यालयातून देण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B01AW1XCJC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’512e1bd2-c799-11e8-8711-9737e7bb1a8b’]
एसटी प्रवास आणखी महागणार, १८ टक्के भाडेवाढीचा पुन्हा प्रस्ताव
बंद होणाऱ्या ५१ शाखांमधील सर्व बँक ग्राहकांना दिलेले चेक बुक ३० नोव्हेंबरपर्यंत बँकेत परत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. नवीन मिळालेल्या आयएफसीएस आणि एमआयसीआर कोडने व्यवहार करण्याच्या सूचना ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र बँकेच्या अध्यक्ष व संचालकांनी केलेला मनमानी खर्च व वाढता एनपीए यामुळे बँकेचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना सर्व नियम धाब्यावर बसवून कर्ज वाटप केल्याने बँकेच्या अध्यक्षांसह पाच अधिकाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याने बँकेची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा ओढा कमी झाला आहे. त्याचा परिणाम बँकेच्या व्यवहारावर झाला आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ शाखा होणार बंद
[amazon_link asins=’B0749PBV51′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’91b57f7c-c797-11e8-9622-3b7ba2ca6985′]