Bank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील ‘या’ 2 मोठ्या बँकाचेही होणार खासगीकरण, कर्मचारी अन् ग्राहकांत संभ्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकाच्या खासगीकरणाबाबत (Bank Privatisation) अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. निती आयोगाने अर्थमंत्रालयाशी सल्लामसलत करून सार्वजनिक क्षेत्रातील दोन बॅंकाचे नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरु केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of India) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (Indian overseas bank) या त्या दोन बॅंका आहेत. निर्गुंतवणुकीच्या (Disinvestment) प्रक्रियेअंतर्गत सरकार सुरुवातीला या 2 बँकांमधील आपला 51 टक्के हिस्सा विकण्याची शक्यता आहे. दरम्यान बँकेच्या खासगीकरणाचा विषय निघाला की कर्मचाऱ्यांचे, ग्राहकांचे काय होणार याबाबत चर्चा सुरू होते. ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही, तसंच बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरही गदा येणार नाही, असेे सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. Bank Privatisation | Privatization of the Central Bank of India, Modi, the Government, the Indian Overseas Bank, and Niti Ayog

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

केंद्र सरकारने (Central Government) फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget) सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) या दोन बँकांसह एका विमा कंपनीच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार नीती आयोगाने (Niti Ayog) चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेअंतर्गत खासगीकरण करण्यात येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नावे सचिवांच्या कोअर कमिटीकडे सादर केली होती. त्यांच्या अहवालानुसार, केंद्रसरकारने सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of India) आणि इंडियन ओव्हरसीज बँकेतील (Indian overseas bank) आपला हिस्सा विकण्याचे निश्चित केले आहे. आता सरकार बँकांच्या खासगीकरणासाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा करेल. रिझर्व्ह बँकेशीही चर्चा होईल, त्यानंतर कार्यवाही होणार आहे. त्यामुळे या प्रकियेला बराच कालावधी लागणार आहे.

या बँकांचे शेअर्स उसळले
या बातमीमुळे या दोन्ही बँकाच्या शेअर्समध्ये आज तब्बल 20 टक्क्यांची वाढ दिसून आली.
सेन्ट्रल बँकेचा शेअर 20 टक्क्यांनी वधारून 24.30 रुपयांवर पोहोचला
तर इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर 19.80 टक्क्यांनी वधारून 23.60 रुपये या वार्षिक उच्च स्तरावर पोहोचला आहे.

Web Titel : Bank Privatisation | Privatization of the Central Bank of India, Modi, the Government, the Indian Overseas Bank, and Niti Ayog

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान मार्च 2022 पर्यंत देणार सरकार

LPG ग्राहक असा बदलू शकतात आपला डिस्ट्रीब्युटर, सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावा लागणार नाही, शुल्कही नाही