Bank Scam | 4300 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपात सहभागी असलेल्या ‘या’ व्यक्तीच्या पत्नीने 9 महिन्याच्या बाळाला दिले 40 कोटी रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Bank Scam | येस बँक (Yes Bank) चे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर (Rana Kapoor) यांची पत्नी बिंदु राणा कपूर (Bindu Rana Kapoor) यांनी आपला 9 महिनाचा नातू आशिव खन्नाला 40 कोटी रुपयांची प्रॉपर्टी गिफ्ट दिली आहे. ही प्रॉपर्टी दिल्लीतील पॉश परिसर जोरबागमध्ये आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, याचा खुलासा Zapkey.com द्वारे उपलब्ध नोंदणी कायदपत्रांद्वारे (Bank Scam) झाला आहे.

झॅपकी डॉट कॉमने उपलब्ध केलेल्या कादपत्रानुसार, प्रॉपर्टी नोंदणी 31 जुलै 2021 ला झाली आहे. ती गिफ्ट डीड म्हणून रजिस्टर्ड झाली आहे. यासाठी राणा कपूर यांच्या पत्नीने 36.90 लाख रुपयांची स्टँप ड्यूटी भरली आहे. हे गिफ्ट डीड आशिव खन्नाची आई राधा कपूर खन्नाच्या माध्यमातून 36.90 लाख रुपयांची स्टँप ड्यूटी (stamp duty) आशिव खन्नाच्या बाजूने भरली आहे.

369 स्क्वेअर मीटरचा फ्लॅट

गिफ्टमध्ये देण्यात आलेल्या प्रॉपर्टीत ग्राऊंड फ्लोअरवर 2 BHK चा फ्लॅटसुद्धा आहे. याशिवाय एक पार्किंग स्लॉट आणि इतर काही सुविधा सुद्धा आहेत. फ्लॅटचा एरिया 369 स्क्वेअर मीटर आहे. संपत्तीचे अंदाजे बाजार मूल्य जवळपास 40-44 कोटी रुपये आहे. याच भागातील आणखी एक प्रॉपर्टी यावर्षी 24 जुलैला 43.5 कोटी रुपयांना विकली गेली होती. कागदपत्रांवरून समजते की, राणा कपूर यांच्या पत्नीला 2004 मध्ये आपल्या वडिलांच्या संपत्तीत एक भाग वारसाने मिळाला होता.

राणा कपूर यांच्यावर आहे 4,300 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

लीगल एक्सपर्टनुसार, गिफ्ट डीड म्हणून जवळच्या व्यक्तीला कोणतीही वस्तू भेट देता येऊ शकते.
प्रॉपर्टीच्या बाबतीत यास ट्रान्सफर करणे आवश्यक आहे.
1 जुलै रोजीच प्रिव्हेंन्शन ऑफ मनी लांड्रिंग अ‍ॅक्ट (PMLA) कोर्टाने राणा कपूरचा जामीन फेटाळला होता.
राणा कपूरवर येस बँकेत 4,300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Web Title : Bank Scam | 40 crore rupees bungalow gift rana kapoor 9 month old grandson got from bindu kapoor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | तुम्हाला सुरू करायचा असेल आपला बिझनेस तर मोदी सरकार देतंय 25 लाख रुपये,
31 पूर्वी येथे करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

Burglary in Pune | बाणेर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी, सव्वापाच लाखाचा ऐवज लंपास

Contactless Service | SBI ने 44 कोटी ग्राहकांना ‘या’ 2 आवश्यक नंबरची दिली माहिती, जाणून घ्या